esakal | अशी घालवा डोक्याची खाज; खास घरगुती उपाय तुमच्यासाठी
sakal

बोलून बातमी शोधा

अशी घालवा डोक्याची खाज; खास घरगुती उपाय तुमच्यासाठी

अशी घालवा डोक्याची खाज; खास घरगुती उपाय तुमच्यासाठी

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : केसांमध्ये कोंडा झाल्यास, उवा झाल्यास, डोक्याच्या त्वचेला घाम आल्यास, डोक्याची त्वचा कोरडी पडल्यास, केमिकल युक्त शाम्पूच्या अति वापरामुळे केस कोरडे पडून डोके खाजवू शकते. सर्वांसमोर डोक्याला खाजवणे ही फार लाजिरवाणी बाब होऊन जाते. समोरचा व्यक्ती आपल्याविषयी काय विचार करेल, असा प्रश्न पडतो. (Itching-of-the-head-then-use-these-home-remedies-nad86)

डोक्याला सतत खाज येत असेल तर कोणत्याच गोष्टीमध्ये मन लागत नाही. पावसाळ्यात ही समस्या अधिक वाढते. डोक्यात खाज येण्याची कारणे बरीच असू शकतात. मात्र, केसांच्या मुळाशी असलेला कोरडेपणा यामुळे खाजेची समस्या अधिक असते. केसांच्या मुळांशी असलेला कोरडेपणा हटवला नाही तर कोंड्याची समस्या सुरू होते. कोंड्यावर योग्य उपचार केले नाहीत तर मायक्रोबायल इन्फेक्शन होऊ शकते. यासाठी केसांचा स्काल्प कधीच कोरडा होऊ देऊ नका. या घरगुती उपायांनी तुम्ही डोक्याला येणारी खाज थांबवू शकता.

हेही वाचा: भाकरी महागली! सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसं?

लिंबाचा रस

डोक्याला खाज येत असल्यास लिंबाच्या रसाचा वापर करा. दोन-तीन चमचे लिंबाचा रस कापसावर घ्या. त्यानंतर हा लिंबाचा रस टाळूवर लावा आणि दहा मिनिटे राहू द्या. नंतर कोमट पाण्याने डोके धुऊन टाका. लिंबाच्या रसात अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे डोक्याची खाज बंद होण्यासाठी मदत मिळेल.

कोरफडीचा गर व खोबरेल तेल

कधी कधी डोक्याची त्वचा कोरडी पडल्यामुळे खाज येत असते. अशावेळी खोबऱ्याचे तेल किंचित गरम करून मालीश करा. खोबऱ्याचे तेल उत्कृष्ट मॉइश्चरायझर आहे. त्याचा प्रभाव थंड असतो. ज्यामुळे खाजेपासून मुक्तता मिळते. कोरफडीच्या गराचा वापर केस सुंदर, मजबूत तसेच डॅंड्रफ फ्री करण्यासाठी केला जातो. डोक्याला येणारी खाज थांबवण्यासाठी केसांच्या मुळापाशी कोरफडीचा गर लावून हलक्या हाताने चोळा. असे केल्याने कोंडा नाहीसा होऊन खाज येणे बंद होईल.

हेही वाचा: लग्नघरातच संपूर्ण कुटुंबाचा अंत; हळदही न निघालेल्या दाम्पत्याचाही मृत्यू

व्हिनेगरचा उपयोग

डोक्याला येणारी खाज थांबवण्यासाठी ॲपल सायडर व्हिनेगरचा उपयोग करता येऊ शकतो. एक चमचा ॲपल सायडर व्हिनेगर कपभर पाण्यात मिसळून कापसाच्या मदतीने डोक्याच्या त्वचेवर लावा. १५ मिनिट राहू द्या. नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या. असे केल्याने डोक्याला येणारी खाज बंद होईल.

बेकिंग सोडा

डोक्याला येणारी खाज थांबवण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण टाळूवर लावा. १५ मिनिट राहू द्या. नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या. असे केल्याने डोक्याला येणारी खाज बंद होण्यास मदत मिळेल. केसांची तसेच केसांखाली असलेल्या त्वचेची स्वच्छता न राखल्याने खाज येते. म्हणून केस वेळच्या वेळी धुण्याची सवय लावा.

हेही वाचा: भाजपशी जवळीक असलेला ओबीसी चेहरा राष्ट्रवादीच्या गळाला

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईल गरम करून कोमट होऊ द्या. हे तेल डोक्याच्या त्वचेवर लावून चांगली मालीश करा. हे तेल रात्रभर राहू द्या आणि सकाळी धुऊन घ्या.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

(Itching-of-the-head-then-use-these-home-remedies-nad86)

loading image