
थोडक्यात:
कोलेस्ट्रॉलप्रमाणेच ट्रायग्लिसराइड वाढल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो.
ट्रायग्लिसराइड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचून ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडथळा निर्माण करतात.
ट्रायग्लिसराइड नियंत्रित ठेवण्यासाठी तज्ज्ञांच्या आहार व जीवनशैलीसंबंधित टिप्स उपयुक्त ठरतात.
What Is Triglyceride And How It Is Dangerous For Health: शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले तर हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. परंतु ट्रायग्लिसराइड देखील तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे कारण असू शकते. कोलेस्ट्रॉलप्रमाणेच ट्रायग्लिसराइड देखील रक्तवाहिन्यांमध्ये साचून ब्लड सर्क्युलेशन थांबवू शकते, ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. हे टाळण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही टिप्स तुम्ही अवलंबू शकता.
ट्रायग्लिसराइड हे कोलेस्ट्रॉलसारखेच रक्तात असलेले एक प्रकारचे फॅट आहे. ज्याचा उपायोग्य शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी करते. मात्र, याचे प्रमाण वाढल्यास हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो आणि ब्लॉकेज निर्माण होऊ शकतो. परिणामी हार्ट अटॅक येतो.
तज्ज्ञांच्या मते आपल्या दररोजच्या घेत असलेल्या आहारामुळे, अन्नामुळे ट्रायग्लिसराइड प्रामुख्याने वाढते. परंतु अन्नाच्या व्यतिरिक्त काही सवयी आहेत ज्या ट्रायग्लिसराइड वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात.
साखर आणि प्रोसेस्ड फूडचे अतिसेवन
शरीरात जास्त साखर गेली की तिचे यकृतामध्ये जाणून रूपांतर ट्रायग्लिसराइड्समध्ये होते. हे फॅट्स रक्तात वाढले की, हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. विशेषतः पॅकेज्ड स्नॅक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, बेकरी प्रोडक्ट्स आणि जास्त गोड पदार्थांमध्ये असलेली प्रक्रिया केलेली साखर शरीरासाठी हानिकारक ठरते. म्हणूनच, शक्य तितके नैसर्गिक गोड पदार्थ, जसे की फळे आणि मध मर्यादित प्रमाणात खावे आणि प्रोसेस्ड पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करावा.
सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट पदार्थांचे सेवन
या प्रकारच्या फॅट्समुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल (LDL) आणि ट्रायग्लिसराइड्स देखील वाढतात, ज्याचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. तळलेले पदार्थ, फास्ट फूड, रेड मीट आणि बटर यामध्ये सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट भरपूर प्रमाणात असतात. त्याऐवजी हेल्दी फॅट्स असलेले पदार्थ, जसे की अवोकाडो, ऑलिव्ह ऑइल, नट्स आणि बिया हे तुम्ही खाऊ शकता.
अति प्रमाणात मद्यपान करणे
मद्यपान केल्याने यकृताच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच ट्रायग्लिसराइड्सची पातळी देखील वाढते. ज्यामुळे लठ्ठपणा, फॅटी लिव्हर आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. त्यामुळे मद्यपान मर्यादित करावे किंवा शक्य असल्यास पूर्णपणेच टाळणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
धूम्रपान
धूम्रपान रक्तातील ट्रायग्लिसराइड आणि खराब कोलेस्टेरॉल वाढवते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. तसेच धूम्रपान केल्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे धूम्रपान करणे पूर्णपणे टाळावे.
बदलती किंवा निष्क्रिय जीवनशैली
आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे जास्तीत जास्त बसूनच काम केले जाते. त्यामुळे शरीरातील जास्त असलेल्या कॅलरीज चरबीच्या रूपात साठतात, ज्यामुळे हृदयरोग, डायबिटीज आणि लठपणाचा धोका वाढतो. यासाठी नियमित व्यायाम करणे, चालणे, सायकलिंग किंवा योग करणे महत्त्वाचे आहे.
- साखर आणि कार्बोहायड्रेटचे आहारातील प्रमाण कमी करणे
- हेल्दी फॅट्सचे सेवन करणे
- नियमित व्यायाम करणे
- पुरेशी झोप घेणे
- ताण- तणाव टाळून ध्यान करणे
ट्रायग्लिसराइड म्हणजे काय? (What are triglycerides?)
ट्रायग्लिसराइड हे रक्तात असलेले एक प्रकारचे फॅट आहे, जे शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी वापरते. मात्र याचे प्रमाण जास्त झाल्यास हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
ट्रायग्लिसराइड वाढण्याची कारणं कोणती? (What causes triglyceride levels to rise?)
जास्त साखर आणि प्रोसेस्ड अन्न, सॅच्युरेटेड व ट्रान्स फॅट्स, मद्यपान, धूम्रपान, आणि निष्क्रिय जीवनशैली ही प्रमुख कारणं आहेत.
ट्रायग्लिसराइड्स वाढल्यास काय धोके असतात? (What are the health risks of high triglycerides?)
ट्रायग्लिसराइड्स जास्त झाल्यास हृदयविकार, स्ट्रोक, ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडथळा आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.
ट्रायग्लिसराइड नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावं? (How to control triglyceride levels?)
नियमित व्यायाम, साखर व कार्बोहायड्रेट कमी करणे, हेल्दी फॅट्सचा समावेश, पुरेशी झोप घेणे आणि तणाव टाळणे हे उपाय उपयुक्त ठरतात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.