Loneliness Side Effects: एक बाकी एकाकी! एकटं राहणं तूम्हाला गंभीर आजाराच्या हवाली करू शकतं, सावध व्हा नाहीतर...

एकाकीपण एकटं येत नाही, आजारपणही घेऊन येतं
Loneliness Side Effects
Loneliness Side Effectsesakal

Loneliness Side Effects: एखाद्या प्रिय व्यक्तीशी भांडलो, ब्रेकअप झाला, कोणाची तरी जास्त आठवण येत असेल की, लगेच स्टेटस (Status) ठेवला जातो. ‘Feeling Alone’ हे वाचून तुम्ही म्हणाल,तूम्हीही कोणाला तरी विचारलं असेल की तूमचं नक्की काय बिनसलं आहे. का एकटी पडली आहेस? अनेकांनी तर चिडून तो स्टेटस बदल असेही सांगितले असेल. होय ना?

तर त्याच झालय कस माहितीय का? सध्याच जग सोशल झालंय. पण त्या सोशल मीडियाचा वापर सोसल तेवढाच करावा हे मात्र लोक विसरून गेलेत. त्यामूळे मग एकाकीपणा वाढत जात आहे. एकाकीपणामूळे अनेक शारिरीक आणि मानसिक आजारांना आमंत्रण दिलं जातं. त्याबद्दलच आज जाणून घेऊयात.

Loneliness Side Effects
World Mental Health Day : कोरोनानंतर मानसिक आजारांत 25 टक्‍यांपर्यंत वाढ

आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहोत. असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. यामुळेच माणसांना न भेटणे आणि एकटेपणामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो. एका अभ्यासानुसार, एकाकीपणामुळे अकाली मृत्यू होतो.

असे लोक सहसा लठ्ठ होतात, धूम्रपानाचे व्यसन करतात आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत होतात. म्हणजे एकाकीपणामुळे हृदयविकार, नैराश्य, चिंता, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा रुग्ण होऊ शकतो.

 जीवनात प्रत्येकालाच कधी न कधी एकटेपणा जाणवतो. वृद्धाश्रमात असणारे आजी आजोबा, आई बाबा जॉबवर गेल्यान एकटा पडलेला त्यांचा मुलगा, दोन मुलींची जबाबदारी अंगावर असलेली एक विधवा स्त्री यांनाही एकटेपणा खातच असतो की. किंवा एखाद्याला बरेच नाती असतील पण त्यांच्यात जर जिव्हाळा नसेल तर नात्यांच्या घोळक्यातही तो एकटा असू शकतो.

Loneliness Side Effects
Mental Health Tips : मुलांनो बोर्ड एक्झामवेळी आजारांपासून लांब राहायचे असेल तर वेळीच करा ही 5 कामे

बर हा एकटेपणा तुम्ही ऑनलाइन राहिल्याने दूर जाईल अस काही नाहीय. ऑनलाइन तर केवळ तुम्ही मेंदूने असाल मन तर वेगळ्याच विचारात गुंतलेलं असेल. मग केवळ मित्र विचारतील, काय रे,काल ऑनलाइन का नव्हतास? म्हणून ऑनलाइन राहावं लागतं. असेही काही अनुभव तुम्ही ऐकले असतील.

 वयानुसार, एखादी व्यक्ती एकाकी होते, परंतु कधीकधी तरुणांनाही एकटेपणाचा सामना करावा लागतो. ज्या लोकांना मित्र नाहीत, किंवा अंतर्मुख आहेत, किंवा अपंग आहेत जे त्यांना सामाजिकतेपासून रोखतात, ते सहसा एकाकी असतात.

 मात्र, सहज मैत्री न करणाऱ्या लोकांकडूनही एकाकीपणावर मात करता येते. तुम्ही स्वतःला काही कामात, छंदात गुंतवून ठेवू शकता, जेणेकरून एकटेपणा तुम्हाला ग्रासणार नाही. तुम्ही सोशल होण्यासाठी क्लब किंवा ग्रुपमध्ये सामील होऊ शकता किंवा एखाद्या व्यावसायिकाची मदत घेऊ शकता. हे करणे देखील महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल.

Loneliness Side Effects
Mental Health : तुमच्या जवळच्यांपैकी कोणाचा स्वभाव स्वतःचं खरं करण्याचा आहे का? सावधान...

या आजारांचे प्रकार आणि कारणे

यामध्ये अतिनैराश्‍याचे, ऑटिझम, राग, पॅनिक ऍटॅक, जास्त जेवणे, आत्महत्येचे विचार, घाबरटपणा, निद्रानाश, अतिसंशय (ओब्सेसिव्ह कॅम्पल्सिव्ह डिसऑर्डर), चिडचिड होणे, आत्मविश्‍वास कमी होणे, अस्वस्थपणा, उदासीनता, एकटेपणाची भावना, स्क्रिझोफेनिया, अल्झायमर, इंटरमिटंट एक्‍सप्लेझिव्ह डिसऑर्डर, मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर या आजारांचे प्रमाण अधिक आहे. 

 मानसिक आजारांची काही लक्षणे 

  • अचानक रडू येणे

  • दुःख वाटणे किंवा सतत रिकामेपणाची भावना असणे

  • झोप न लागणे किंवा अधिक झोप लागणे

  • सतत थकल्यासारखे वाटणे

  • आत्महत्येचे विचार येणे

  • आशावादाचा अभाव

  • एकलकोंडेपणा

  • सतत अस्वस्थता वाटणे

Loneliness Side Effects
Summer Health : उन्हाळ्यात केलेल्या या चुका पडतील महागात; वेळीच सावध व्हा !

डिस्टिमिया

एकटेपणामुळे उद्भवणारी सर्वात सामान्य आरोग्य स्थिती आहे. याने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला नेहमीच एकटे राहायचे असते. तथापि, हा शारीरिक आजार नाही. डिस्टिमिया ही एक जुनाट मानसिक स्थिती आहे. ज्यामुळे एखादी व्यक्ती हळूहळू आत्मविश्वास आणि आत्मबल गमावते.

सामाजिक ताण

ज्यांना या समस्येचा सामना करावा लागतो त्यांना सहसा इतर लोकांशी संवाद साधण्यात अडचण येते. ते इतरांशी बोलण्यास टाळाटाळ करतात, घाबरतात आणि बऱ्याच बाबतीत लाजतातही.

वजन वाढणे

'इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर ॲण्ड अलाइड साइंसेज डिपार्टमेण्ट ऑफ सायकेस्ट्री ' चे प्रोफेसर डाॅ. ओमप्रकाश सांगतात, की खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, बैठी आणि अनियंत्रित जीवनशैली यामुळे  वजन वाढतं. याचसोबत मानसिक आरोग्याचाही लठ्ठपणा वाढण्यावर परिणाम होतो. तर लठ्ठपणा वाढण्याचा परिणाम मानसिक आरोग्य बिघडण्यावर होतो असं अभ्यासातून सिध्द झालं आहे. 

Loneliness Side Effects
Public Health System : ‘सार्वजनिक आरोग्य’ला औषधांच्या चणचणीने ग्रासलंय!

शारिरीक व्याधी

जुनाट आजार एकाकीपणामुळेही अनेक गंभीर आजार होतात, जसे की उच्च रक्तदाब, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका. संशोधनात असेही सिद्ध झाले आहे की एकाकीपणामुळे या सर्व आजारांचा धोका वाढतो.

कॅन्सरचा धोका वाढतो

कॅन्सरबायोलॉजिस्टने हे सिद्ध केले आहे की एकाकीपणामुळे शरीरात हार्मोनल बदल होतात. तणावामुळे आपले शरीर कमकुवत होते, त्यामुळे रोगांशी लढण्याची क्षमताही कमी होते, त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये तणाव अधिक

रोजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच शारीरिक दुखणे व विविध आजारांना सामोरे जावे लागते. वेळीच उपचार घेऊन आपण त्यावर मातही करतो. पण, मानसिक आजारांबाबत तसे होत नाही. नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी आणि हार्मोन्सच्या बदलांमुळे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये तणाव अधिक असल्याने त्या मनोविकाराने सर्वाधिक त्रस्त आहेत.

Loneliness Side Effects
Health Tips : तूमच्या घोरण्यानं इतरांच्या झोपेचे वाजतायत तीन तेरा? मग हे उपाय आताच सुरू करा! 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com