
थोडक्यात:
भारतात विशेषतः शहरी भागात व्हिटॅमिन D ची कमतरता झपाट्याने वाढत आहे.
सूर्यप्रकाशात कमी वेळ घालवणे आणि असंतुलित आहार ही प्रमुख कारणे आहेत.
सुरुवातीला लक्षणे दिसून न येता नंतर हाडदुखी, थकवा आणि मानसिक समस्या जाणवू शकतात.
Reasons Of Vitamin D Deficiency: भारतामध्ये विशेषतः शहरी भागात व्हिटॅमिन D च्या कमतरतेची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. लोक सूर्यप्रकाशात कमी वेळ घालवत आहेत आणि आहाराकडे दुर्लक्ष करत आहेत, यामुळे शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता जाणवते. सुरुवातीच्या काळात या कमतरतेची लक्षणे दिसून येत नाहीत, पण जेव्हा त्रास होऊ लागतो, तेव्हा लोक तपासणी करतात तेव्हा त्यांना हे समजते. हाडांमध्ये आणि सांध्यांमध्ये वेदना, थकवा, आणि काही वेळा न्यूरोलॉजिकल समस्या देखील उद्भवू शकतात. चला तर मग या संदर्भात काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.
व्हिटॅमिन D ची कमतरता होण्याचे मुख्य कारण म्हणजे सूर्यप्रकाशाचा अभाव. आजकाल कामाच्या वाढत्या वेळांमुळे आणि बदलत्या पद्धतींमुळे लोक जास्तीत जास्त वेळ बंदिस्त आणि कमी प्रकाशाच्या खोल्यामध्ये, घरातच बसून काम करतात. तसेच जास्त प्रमाणात सनस्क्रीनचा वापर करणे आणि आणि काही आरोग्यविषयक समस्या यामुळेही शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन D मिळत नाही.
- हाडे आणि स्नायूंमध्ये सतत दुखणे
- सतत थकवा जाणवणे
- वारंवार डोकेदुखी
- वजन कमी होणे
- दातदुखी
- केस गळणे
- चिंता, भीती किंवा घबराटीची भावना
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, शरीरात व्हिटॅमिन D चे प्रमाण किमान 20 mg/mL किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी 50 mg/mL ते 125 ng/mL हे प्रमाण आदर्श मानले जाते. जर हे प्रमाण 20 mg/mL पेक्षा कमी असेल, तर व्हिटॅमिन D ची कमतरता असल्याचे समजले जाते आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.
- दररोज 20-30 मिनिटे उन्हात बसा. (सकाळी ८ - ११ ची वेळ उत्तम)
- आहारात मासे, अंडी, दूध, चीज, मशरूम यांचा समावेश करा.
- डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन Dचे सप्लिमेंट्स घ्या.
- आरोग्य तपासणी करून व्हिटॅमिन Dची पातळी नियमित तपासा.
1. व्हिटॅमिन D ची कमतरता का होते?
(What causes Vitamin D deficiency?)
सूर्यप्रकाशात कमी वेळ घालवणे, बंदिस्त ठिकाणी काम करणे, सनस्क्रीनचा जास्त वापर आणि काही आरोग्यविषयक समस्या यामुळे व्हिटॅमिन D ची कमतरता होते.
2. व्हिटॅमिन D ची कमतरता असल्याची लक्षणे कोणती?
(What are the symptoms of Vitamin D deficiency?)
सतत थकवा, हाडदुखी, डोकेदुखी, केस गळणे, दातदुखी आणि मानसिक अस्वस्थता ही लक्षणे असू शकतात.
3. शरीरासाठी व्हिटॅमिन D चे आदर्श प्रमाण किती असावे?
(What is the ideal Vitamin D level for the body?)
शरीरात व्हिटॅमिन D चे प्रमाण किमान 20 mg/mL असावे, आणि 50 ते 125 ng/mL हे प्रमाण आरोग्यदृष्ट्या योग्य मानले जाते.
4. व्हिटॅमिन D ची पातळी नैसर्गिकरित्या कशी वाढवावी?
(How can you naturally increase Vitamin D levels?)
दररोज सकाळच्या उन्हात बसणे, आहारात व्हिटॅमिन D युक्त पदार्थांचा समावेश करणे आणि गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेणे फायदेशीर ठरते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.