बँक कर्मचाऱ्यांच्या संपाने 3500 कोटींचे व्‍यवहार ठप्‍प | Jalgaon

bank emplyee strike
bank emplyee strike esakal

जळगाव : केंद्र सरकारने (Central Government) राष्ट्रीयकृत बँकांचे (Nationalized Bank) खासगीकरण (Privatization) करण्याचा प्रयत्‍न सुरू केला आहे. बँकांचे खासगीकरण थांबविण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) कर्मचाऱ्यांसह दहा बँक संघटनांनी दोन दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले होते. गुरुवार व शुक्रवारी (ता. 16 व 17) दोन दिवसात जिल्‍ह्यातील सुमारे 3500 कोटी रुपयांचे व्‍यवहार ठप्‍प झाले आहेत. तिसरा शनिवार असल्याने बँका सुरू होत्या. बँका सुरू होताच ग्राहकांची व्यवहार करण्यासाठी झुंबड उडाली होती. रविवारी (ता. 19) सुटीचा दिवस असल्याने पुन्हा बँका बंद राहतील.

ग्राहकांचे हाल

या संपामुळे ग्राहकांना बँकेचे व्यवहारच करता आले नाही. अनेकांनी ऑनलाइन सुविधेचा लाभ घेतला. मात्र ज्यांच्याकडे मोबाईल नाही, दोन- पाचशे रुपये काढण्यासाठी स्लिप भरून पैसे काढावे लागतात. त्यांना पैसे काढता आले नाही. व्यापारी, उद्योजकांसह सर्वांनाच या संपाचा परिणाम भोगावा लागला. अनेक विविध प्रकारचे व्यवहार ठप्प झाले होते.

bank emplyee strike
जळगावातील रस्त्यांबाबत सोमवारी मुंबईत या! पवारांची आयुक्तांना तंबी

आठशे कर्मचाऱ्यांचा सहभाग

जळगाव जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँक अधिकारी व कर्मचारी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन (United Forum of Bank Union) व ऑल इंडिया बँकिंग ऑफिसर्स कॉन्फेडरेशनच्या (All India Banking Officers Confederation) झेंड्याखाली एकत्र येऊन बँक खासगीकरणाविरोधात गेले दोन दिवस बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. केंद्र सरकारच्या प्रस्तावित बँकिंग अमेंडमेंट बिल 2021 मध्ये होऊ घातलेल्या खासगीकरणाच्या धोरणांच्या विरोधात निदर्शने केली होती.

युनायटेड फोरमचे जिल्हा समन्वयक अभिलाष बोरकर, स्टेट बँकेचे प्रसाद पाटील, दत्ता चौधरी, शफीक पिंजारी, विजय सपकाळे, अशोक देवरे, धनंजय गवांदे, सारिका सोनार, सेन्ट्रल बँकेचे श्री. जावरे, महाराष्ट्र बँकेचे खेवलकर, प्रतिक देव बँक ऑफ बडोदाचे विकास कात्यायनी, बँक ऑफ इंडियाचे अनुप जाजू, युनियन बँकेचे तुषार सूर्यवंशी, फेडरल बँकेचे प्रमोद शिंपी, इंडियन बँकेचे गणेश होपल यांनी संपात सहभाग घेतला.

bank emplyee strike
जळगाव : सावधान..! रस्त्यावरून चालताना मोबाईल लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com