Jalgaon Aner Dam : ‘अनेर’ 100 टक्के भरले; रब्बीच्या आशा पल्लवित | Aner dam 100 percent filled jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aner Dam

Jalgaon Aner Dam : ‘अनेर’ 100 टक्के भरले; रब्बीच्या आशा पल्लवित

Jalgaon Aner Dam : येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेले अनेर धरण शंभर टक्के भरले असून, आता रब्बीसाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Aner dam 100 percent filled jalgaon news)

धरण पात्रात ५५० मिलिमीटर पाऊस झाला असून, धरण पूर्ण म्हणजे २१६.४० मीटर क्षमतेने भरले आहे. या धरणातून चोपडा तालुक्यातील मराठे, शिकावल, गणपूर, लासूर शिवाराला पाणीपुरवठा केला जातो.

तर धुळे जिल्ह्यातील तोंदे, हिसाळे, बभळाज, तरडी, भावेर, होळनांथे, मांजरोद, पिळोदे, घोडीसगाव आदी शिवारातील शेतीला पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या नदीपात्रात धरणाच्या दोन दरवाजातून ३२८० क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे.

टॅग्स :JalgaondamWater Reserves