Jalgaon News : दुर्मिळ ‘रेक्टल प्रोलॅप्स’ आजाराने ग्रस्त रुग्णाला दिलासा

दुर्मिळ आजाराने ग्रस्त रुग्णावर लॅप्रोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करून त्याला दुखापतीतून मुक्त करण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) वैद्यकीय पथकाला यश आले.
While saying goodbye to a patient suffering from a rare disease of 'Rectal Prolapse', the founder Dr. Girish Thakur, Medical Superintendent Dr. Vijay Gaikwad etc.
While saying goodbye to a patient suffering from a rare disease of 'Rectal Prolapse', the founder Dr. Girish Thakur, Medical Superintendent Dr. Vijay Gaikwad etc.esakal

Jalgaon News : दुर्मिळ आजाराने ग्रस्त रुग्णावर लॅप्रोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करून त्याला दुखापतीतून मुक्त करण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) वैद्यकीय पथकाला यश आले. याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी पथकाचे अभिनंदन करून रुग्णालयातून रुग्णाला निरोप दिला.

गणेश पाटील (रा. जळगाव) यांना गेल्या एक वर्षापासून शौचाची जागा बाहेर आल्यामुळे त्रास होत होता. खासगी दवाखान्यात येणारा खर्च हा लाखांत असल्याने तो झेपणारा नव्हता. (GMC medical team successfully operated patient suffering from rare disease through laparoscopy jalgaon news)

त्यामुळे त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणी केली. तेथे सर्जरी युनिट ३ चे प्रमुख डॉ. रोहन पाटील यांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.

त्यानुसार सर्व वैद्यकीय चाचण्या करून रुग्णावर डॉ. पाटील यांच्या नेतृत्वात पथकाने ‘लॅप्रोस्कोपीक रेक्टल प्रोलॅप्स’ शस्त्रक्रिया करून दिलासा दिला. यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ रुग्णाला मिळाला.

शस्त्रक्रिया युनिट ३ प्रमुख व सहयोगी प्राध्यापक डॉ. रोहन पाटील, डॉ. ईश्वरी भोबे, डॉ. झिया उल हक, डॉ. बिन्दूश्री, डॉ. जैद पठाण यांनी केली आहे. विभागप्रमुख डॉ. मारोती पोटे यांचे मार्गदर्शन लाभले. बधिरीकरण शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. अमित हिवरकर, डॉ. सुभेदार, परिचारिका सुरेखा महाजन, तुळसा माळी यांनी सहकार्य केले.

While saying goodbye to a patient suffering from a rare disease of 'Rectal Prolapse', the founder Dr. Girish Thakur, Medical Superintendent Dr. Vijay Gaikwad etc.
Jalgaon Cotton News : हंगाम संपला तरी कापसाला नाही उठाव; यंदा केवळ 7 लाख गाठींचे उत्पादन

या प्रकारची शस्त्रक्रिया ही मुंबई येथील के ई एम हॉस्पिटल, जे जे हॉस्पिटलमध्ये केली जाते. परंतु खानदेशामध्ये सर्वप्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली. रुग्णावर यशस्वीपणे उपचार करून त्रासातून मुक्त करण्यात आले.

बद्धकोष्ठतेमुळे होतो आजार

लॅप्रोस्कोपी सर्जन व सहयोगी प्राध्यापक डॉ. रोहन पाटील यांनी सांगितले, की ज्या रुग्णांना लॅप्रोस्कोपीद्वारे उपचार जसे की, पित्ताशयामध्ये खडे होणे, अपेंडिक्स अशा प्रकारच्या आजारांवर लॅप्रोस्कोपीद्वारे उपचार करायचे असतील तर त्यांनी ओपीडीत सर्जरी विभागांमध्ये संपर्क साधावा.

‘रेक्टल प्रोलॅप्स’ आजार हे बद्धकोष्ठतेमुळे होतात. रुग्णांनी असे आजार टाळण्यासाठी अवेळी जेवण टाळा, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिरवा भाजीपाला, फायबर याचे सेवन करा. बद्धकोष्ठता जर होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत.

While saying goodbye to a patient suffering from a rare disease of 'Rectal Prolapse', the founder Dr. Girish Thakur, Medical Superintendent Dr. Vijay Gaikwad etc.
Jalgaon News : यंत्रणांच्या उदासीनतेने हायकोर्टाची ‘तारीख पे तारीख’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com