Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवातून पालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी; एरंडोल शहरात ठिकठिकाणी स्वागताचे फलक

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवातून पालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी; एरंडोल शहरात ठिकठिकाणी स्वागताचे फलक

Ganeshotsav 2023 : नगरपालिकेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरु केली असून, शहरात ठिकठिकाणी इच्छुक उमेदवारांनी गणपतीच्या स्वागताचे फलक लावून वातावरण निर्मितीचा प्रयत्न सुरू केला आहे.

नगरपालिकेची मुदत संपल्यामुळे सुमारे दोन वर्षांपासून पालिकेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिका निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढणार आहे.

पालिकेच्या निवडणुका केव्हा होणार याबाबत कोणतीही शाश्वती नसताना इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

गणेशोत्सवाच्या माध्यमातून इच्छूक उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील गणेश मंडळात सक्रिय सहभागी होऊन वातावरण निर्मितीचा प्रयत्न सुरू केला आहे. इच्छूक उमेदवारांनी गणेश मंडळाना सर्व प्रकारचे सहकार्य करून मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संघटित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

प्रत्येक प्रभागात सुमारे दोन ते तीन सार्वजनिक गणेश मंडळ असल्यामुळे इच्छूक उमेदवार व त्यांचे समर्थकांनी गणेश भक्तांचे स्वागत फलक लावले आहे. स्वागत फलकावर भावी नगरसेवक, युवासम्राट, युवकांचे प्रेरणास्थान यासह विविध घोषणांचा मजकूर इच्छूक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी छापून निवडणुकीचे रणशिंग फुकण्याचा प्रयत्न सुरू केला

आहे. नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावर पालिका निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असले तरी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांनी शहारातील सर्व सार्वजनिक मंडळांसह लहान मंडळांना सहकार्य करून कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढवला आहे.

माजी नगराध्यक्ष मुकुंदसिंग परदेशी, देविदास महाजन, रमेश परदेशी, रवींद्र महाजन, किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, दशरथ महाजन, भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख ॲड. किशोर काळकर, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, प्रा. मनोज पाटील, कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन यांच्यासह अनेक पदाधिकार्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवातून पालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी; एरंडोल शहरात ठिकठिकाणी स्वागताचे फलक
Konkan Ganeshotsav : गणेश विसर्जनात मगरींचं विघ्न; जीव मुठीत धरून करावं लागतंय बाप्पाचं विसर्जन, नदीत फोडले जाताहेत बॉम्ब!

जयगुरु व्यायामशाळा, संत सावता माळी व्यायामशाळा, ज्ञानदीप गणेश मंडळ, नागराज गणेश मंडळ, बालाजी गणेश मंडळ, जयहिंद व्यायामशाळा, बालवीर गणेश मंडळ, बालमित्र गणेश मंडळ या प्रमुख मंडळाच्या माध्यमातून अनेकांना शहराचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. गणेशोत्सव युवकांसाठी नेतृत्व सिद्ध करण्याची मोठी संधी असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे युवा पदाधिकारी यामध्ये सक्रिय सहभागी होत असतात. सद्यस्थितीत सर्व सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये माजी नगरसेवक, राजकीय पक्षांचे युवा पदाधिकारी, सामाजिक व

शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे युवक तसेच सार्वजनिक मंडळांचे संस्थापक सदस्य नेतृत्व करीत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असल्यामुळे मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न गणेशोत्सवाच्या माध्यमातून केला जात आहे.

कट्टर विरोधकही एकत्र

ग्रामीण भागात देखील जिल्हापरिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन गणेश मंडळाच्या पदाधिका-यांशी संपर्क करून सर्व

प्रकारचे सहकार्य केले आहे. शहरात एका वर्षात घडलेल्या राजकीय घडामोडींबाबत मतदारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असून त्याचा परिणाम पालिका निवडणुकीवर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राजकीय क्षेत्रातील कट्टर विरोधक अचानक एकत्र आल्यामुळे त्यांच्या समर्थकांचा गणेशोत्सवातील सहभाग वाढला आहे.

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवातून पालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी; एरंडोल शहरात ठिकठिकाणी स्वागताचे फलक
Sangli Ganeshotsav : आकर्षक सजावट अन् लक्षवेधी गणेश मूर्ती; पाहा लाडक्या बाप्पाची विविध रुपातील झलक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com