Jalgaon Crime News : मध्यवर्ती बसस्थानकात पर्समधून दागिने लंपास

crime news
crime news esakal

Jalgaon Crime News : शहरातील मध्यवर्ती नवीन बस स्थानकात बसमधील प्रवासी महिलेच्या बॅगमधून २६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास (Theft) केले. (Jalgaon News) जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Thieves looted gold jewelry worth 26 thousand from the woman bag jalgaon crime news)

काजल कमलेश पवार (वय २५, रा. कल्याण जि. ठाणे) या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. काजल पवार या भुसावळ येथून सोमवारी (ता.१०) सकाळी ११ वाजता नातेवाइकांकडे जळगावला येण्यासाठी रावेर - पुणे बसमध्ये बसल्या होत्या. साधारण साडेबारा वाजेच्या सुमारास बस जळगाव स्थानकावर पोचली.

काजल यांच्या सोबत त्यांची नणंद भारती भागवत पवार अशा दोघी बसस्थानकाबाहेरून रिक्षात बसत असतांना काजल यांना बॅगची चैन उघडी दिसली. त्यांना शंका आल्याने लगेचच त्यांनी बॅग मधील लहान पर्स तपासली असता ती गायब असल्याने तातडीने त्या स्थानकावरच उभ्या रावेर-जळगाव या बसमध्ये आल्या.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

crime news
Jalgaon Crime News : जळगाव शहरातून 2 दुचाकी लंपास

माझी पर्स खाली पडलीय का? अशी विचारणा त्यांनी केली. मात्र, कंडक्टर यांनी सर्व बस शोधूनही पर्स सापडली नसल्याने काजल पवार यांनी जिल्‍हापेठ पोलिस ठाणे गाठत पर्समधील दागिने, पॅनकार्ड, कोटक महिंद्र बँकेचे एटीएम असे सर्व साहित्य चोरीस गेल्याची तक्रार दिली.

crime news
Jalgaon Crime News : समतानगरात बापलेकास मारहाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com