Vidhan Sabha 2019 : मतदानानंतरच्या रॅलीबद्दल आमदारावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

आमदार संजय कदम यांच्यासह 29 जणांवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल. 

खेड - सोमवारी मतदान झाल्यानंतर मनाई आदेश असतानाही रॅली काढल्याप्रकरणी आमदार संजय कदम यांच्यासह 29 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही कार्यवाही खेडच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील यांनी संयुक्तपणे केली.

Vidhan Sabha 2019 : सिंधुदुर्गात मतदानाचा घटला टक्का; कुणाला धक्का ! 

काल रात्री (ता.21) आठ ते साडेआठ वाजता चारचाकी वाहनामधून तसेच दुचाकीवरून सुमारे दोनशे ते अडीचशे माणसे मोठ्याने ओरडत गाड्याचे हॉर्न वाजवत खेड ते भरणे मार्गावर जात होते. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.

काँग्रेस नेते ओसाड गावचे पाटील; ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची टीका 

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सायली कदम, वैभव खेडेकर, अजय पिंपरे, तौसिफ सांगले, प्रमोद जाधव, धीरज कदम, ओमकार कदम, पंकज जाधव, कौशल चिखले, मिलिंद नांदगावकर, बाबू नांदगावकर, संतोष पवार, स. तु. कदम, सुनील चव्हाण, साहिल कदम, प्रसाद कदम, विनोद तांबे, गोंदकर, विजय जाधव, सुरेश मोरे, राहुल कोकाटे, बाबा मुदतसर, प्रकाश शिगवण, सतीश कदम, सचिन जाधव, इम्तियाज खलिफ, प्रदोष सावंत, चेतन धामणकर यांचा समावेश आहे. 

दापोली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम व विद्यमान आमदार काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्यात काँटे की टक्कर झाली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक निकालाची शक्‍यता; शिवसेना बॅकफूटवर ? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against 29 people including MLA Sanjay kadam