कोकणः चार वर्षात दोनवेळा रस्ते; कोटीत खर्च तरीही...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

साडवलीः देवरुख नगरपंचायतीतर्फे चार वर्षात दोनवेळा मुख्य रस्ते केले गेले, कोटीत खर्च करण्यात आला तरीही शिवाजी चौक ते बसस्थानक या मार्गावर पुन्हा मोठ मोठे खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यात एक महिला पडली तीचा पाय मुरगळला तर शनिवारी एक दुचाकी वाला कोसळला. यामुळे रस्ते किती मजबूत झाले आहेत याची कल्पना येत आहे.

भाजप आणि सेनेची सत्ता असताना खड्डे पडलेल्या रस्त्यात तेव्हा माजी राज्यमंत्र्याना घेवून राषट्रवादीने वृक्षारोपण करुन निषेध केला होता आता भाजप राषट्रवादी सत्तेत आहे तरी खड्डे आहेत आता कुणी काय करायचे असे नागरीक विचारत आहेत.

नगरपंचायत या खड्यांसाठी ठेकेदारांना कि पावसाला जबाबदार धरणार? असा उपरोधीक सवाल नागरीक विचारत आहेत. शिवाजी चौक ते बसस्धानक हा प्रमुख रहदारीचा मार्ग आहे. याच मार्गावर हे खड्डे आहेत. शाळा, महाविद्यालयांकडे जाण्यासाठी मुले हाच मार्ग वापरतात. त्यांनाही खड्डे चुकवत गाड्यांचे उडणारे पाणी चुकवत कसरत करत जावे लागते. नगरपंचायतीने दोन दिवसात हे खड्डे भरावेत अन्यथा शिवसैनिक याच खड्यात झाडे लावण्याचा एककलमी कार्यक्रम राबवणार आहेत.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: konkan news devrukh nagar panchayat and road