
पालिकेच्या पाणी विभागाने पाणीपुरवठा व्यवस्था प्रतिबंधात्मक देखभाल व दुरुस्तीकरिता बाष्पीभवनाचा धोका ओळखून पाण्याचे नियोजन सुरू केले आहे.
रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दुप्पट साठा आहे; परंतु वाढता उष्मा आणि भविष्यात १५ जूनपर्यंत शहरवासीयांना टंचाईला तोंड द्यावे लागू नये, यासाठी पाणी वाटपाचे नियोजन केले आहे. एप्रिलपासून पाणी कपातीला सुरुवात केली जाईल. ३० मार्चला गुढीपाडवा आणि ३१ ला ईद असल्याने एप्रिलपासून दर सोमवारी कपातीला सुरुवात केली जाणार आहे. पालिका प्रशासनाने याला दुजोरा दिला.