
Jasprit Bumrah: भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गाजवली आहे. मेलबर्न कसोटीवरही जसप्रीतने दोन्ही डावांत ९ विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याचा त्याला फायदा झाला आहे. आयसीसीने आज जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत जसप्रीतने त्याची अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. त्याचसोबत तो भारताकडून सर्वाधाकि गुण मिळवणारा कसोटी गोलंदाज बनला आहे. जसप्रीतचे ९०७ रेटिंग गुण आहेत आणि त्याने माजी फिरकीपटू आर अश्विन ( ९०४) याचा डिसेंबर २०१६ सालचा विक्रम मोडला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत हा ९०७ गुणांसह जागात इंग्लंडच्या डेरेक उंडरवूडसह संयुक्तपणे १७व्या क्रमांकावर आहे.