

MS Dhoni - Suresh Raina | CSK vs SRH | IPL 2026
Sakal
IPL 2026, CSK vs SRH, Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला सोमवारी (१८ मे) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ५ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.
हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानात चेपॉक स्टेडियमवर (Chepauk) खेळवला गेला. चेन्नईचा हा घरच्या मैदानातील शेवटचा सामना होता. त्यामुळे या सामन्यात धोनी (MS Dhoni) खेळेल, असे अनेकांना अपेक्षित होते. मात्र तो या सामन्यात खेळला नाही, पण त्याचे दर्शन मात्र घरच्या चाहत्यांना झाले.