
Chennai Super Kings vs Delhi Capitals Marathi Update: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या यंदाच्या पर्वात दिल्ली कॅपिटल्स व पंजाब किंग्स हे दोनच संघ अपराजित राहिले आहेत. त्याच दिल्ली विरुद्ध आज चेन्नई सुपर किंग्सला घरच्या मैदानावर खेळावे लागणार आहे. CSK ला तीन सामन्यांत फक्त एक विजय मिळवता आला आहे आणि ते गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. त्यात ऋतुराज गायकवाड याच्या आजच्या लढतीत खेळण्यावर प्रश्नचिन्ह होते. पण, तो खेळला अन् नाणेफेकीलाही आला.