Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Marathi Update: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या प्ले ऑफच्या शर्यतीला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली आहे. इथे प्रत्येक निकाल हा त्या सामन्यावरच नव्हे, तर इतरांवरही परिणाम करणारा ठरणार आहे. आजच्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाइटर रायडर्स व दिल्ली कॅपिटल्स समोरासमोर आहेत. KKR ला या पर्वात साजेशी कामगिरी करता आलेली नसली, तरी ते अजूनही शर्यतीत आहेत. DC १२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे आणि त्यांच्याकडे प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी जास्त संधी आहेत.