
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मंगळवारी (८ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात झालेल्या सामन्यात चौकार षटकारांची आतिशबाजी पाहायला मिळाली. पण याचदरम्यान, दिग्वेश राठीने घेतलेली सुनील नरेनची विकेटही चर्चेचा विषय ठरली.
या सामन्यात लखनौने वादळी खेळ करताना कोलकातासमोर २३९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकातानेही दमदार सुरुवात केली.
सलामीवीर क्विटन डी कॉक २ षटकारांसह १५ धावा करून तिसऱ्या षटकात आकाश दीपविरुद्ध पायचीत झाला. पण नंतर सुनील नरेन आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी तुफानी फटकेबाजी करत ६ षटकात ९० धावा संघाला पार करून दिला.