Will Vaibhav Sooryavanshi Reach 300 Runs Today
esakal
CSK vs RR Match : आयपीएलमध्ये आज चेन्नई विरुद्ध राजस्थान यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याशिवाय वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीकडेही सर्वांच्या नजरा असणार आहेत. वैभवने गेल्या हंगामात चेन्नईविरुद्ध अर्धशतकीय खेळी केली होती. त्यामुळे या सामन्यातही त्याच्याकडून अशाच दमदार खेळीची अपेक्षा आहे. महत्त्वाचं म्हणजे, तो या सामन्यात आयपीएलमधील ३०० धावांचा टप्पा पार करतो का, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.