पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. १० सामन्यांत ६ विजय व एक अनिर्णित निकालासह पंजाबच्या खात्यात १३ गुण झाले आहेत. प्ले ऑफची जागा पक्की करण्यासाठी त्यांना आता चारपैकी किमान दोन सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. कालच्या लढतीत युझवेंद्र चहलने एका षटकात चार विकेट्ससह हॅटट्रिक घेतली, तर प्रभसिमरन सिंग व श्रेयस अय्यर यांनी वादळी खेळी केली. श्रेयसला प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला आणि लगेचच बीसीसीआयने दंडात्मक कारवाई केली.