Cleaning Tips : तुमच्या बाळाची दुधाची बाटली स्वच्छ आहे ना?चेक करा, नाहीतर...

दुधाची बाटली अस्वच्छ असेल तर बाळ सतत आजारी पडतो
Cleaning Tips
Cleaning Tipsesakal

Cleaning Tips : बाळ जन्माला आलं की घरात कसं आनंदाचं वातावरण निर्माण होतं. बाळाची काळजी घेण्यात जो तो व्यक्ती मग्न असतो. बाळाची आईच नाही तर आजी, आजोबा, पणजी या सगळ्याच त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. पण, बाळाला दिले जाणाऱ्या दुधाच्या बाटलीचं काय?

Cleaning Tips
Baby Diet Plan: मुलांना सुका मेवा कसा द्यायचा?

जेव्हा बाळाला काही त्रास होतो, त्याला हॉस्पिटलमध्ये नेले जाते तेव्हा डॉक्टर म्हणतात, बाळाला बाटलीने दुध देऊ नका, बाटली स्वच्छ करा. पण आपण म्हणावे तितके लक्ष देत नाही. बाळाला सतत पोटात इन्फेक्शन होत असेल तर त्याला कारणीभूत तुमची दुधाची बाटली आहे हे लक्षात ठेवा.

बाळाची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. अशावेळी त्यांना कोणत्या गोष्टी संसर्ग होऊ नये. यासाठी विशेष काळजी घ्यावी. तसेच दुधाची बाटली ही बाहेरची गोष्ट बाळाच्या थेट तोंडात जाते. यामुळे संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे या पद्धतीने बाळांची बाटली निर्जंतुकीकरण करून घ्या.

Cleaning Tips
Newborn Baby Care: धक्कादायक! 'या' कारणांमुळे दरवर्षी होतो कोट्यावधी नवजात बालकांचा मृत्यू

उकळत्या पाण्याचा वापर करणे हा बाळाच्या बाटल्यांचे निर्जंतुकीकरण करण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात कमी खर्चाचा मार्ग आहे. उकळत्या पाण्याचे उच्च तापमान बाटल्यांच्या पृष्ठभागावर चिकटलेले कोणतेही जीवाणू नष्ट करते.

बाटली  पाण्यात 10 मिनिटे उकळवा. गॅसवर एक रुंद पॅन ठेवा, त्यात ३/४ भाग पाण्याने भरा आणि गॅस चालू करा.  बाटलीचे भाग वेगळे करा. एकदा पाणी गरम होण्यास सुरुवात झाली की, चिमट्याच्या सहाय्याने बाटली आणि त्याचे भाग काळजीपूर्वक पाण्यात टाका. पाण्यात बाटलीचे निपल टाकू नका. ते निर्जंतुक करण्यासाठी फक्त चिमट्याने उकळत्या पाण्यात ३० सेकंद धरून ठेवा.

तुम्ही तुमच्या बाळासोबत प्रवास करत असताना बाटल्यांचे निर्जंतुकीकरण करणे कठीण होऊ शकते. ही अशी वेळ असते जेव्हा जंतूंना तुमच्या बाळावर आक्रमण करण्याची आणि त्याला किंवा तिला आजारी बनवण्याची संधी मिळते.

निर्जंतुकीकरण गोळ्या

निर्जंतुकीकरण गोळ्या पाण्यात मिक्स होऊ द्या. बाटली पूर्णपणे पाण्यात बुडवण्यासाठी पुरेसे पाणी असलेले एक मोठे भांडे भरा. त्यात दोन निर्जंतुकीकरण गोळ्या टाका आणि त्या पाण्यात पूर्णपणे विरघळेपर्यंत स्वच्छ चमच्याने हलवा.

Cleaning Tips
Baby Care: थंडीच्या दिवसात बाळाची काळजी कशी घ्यावी ?

हे उकळत्या पाण्याप्रमाणेच काम करते. जिवाणू आणि इतर जंतू वाफेच्या उच्च तापमानाचा सामना करू शकत नाहीत आणि वाफेच्या संपर्कात येताच ते मरतात. बाळाची बाटली योग्य प्रकारे स्वच्छ आणि निर्जंतुक करण्याची ही दुसरी सोपी पद्धत आहे.

बाटली मायक्रोवेव्हमध्ये स्वच्छ करा

बाटली मायक्रोवेव्हमध्ये ठेवा आणि २ मिनिटे जास्त तापमानावर गरम करा किंवा जोपर्यंत तुम्हाला वाफ येत नाही तोपर्यंत गरम करा. वाफ निघून जाईपर्यंत एक मिनिट तसेच ठेवा द्या. बाटली बाहेर काढा आणि त्यांना हवेत कोरडे होऊ द्या.

Cleaning Tips
Baby Care Tips : सावधान! लहान बाळांची घ्या काळजी अन्यथा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com