Skin Care: विचार न करता वापरू नये होम रेमेडीज, भोगावे लागतील गंभीर परीणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Skin Care

Skin Care: विचार न करता वापरू नये होम रेमेडीज, भोगावे लागतील गंभीर परीणाम

आम्ही तुम्हाला असे काही होम रेमेडीज विषयी सांगणार जे विचार न करता वापरू नये. चला तर मग जाणून घेऊया...

जसे बाजारात उपलब्ध सर्वच प्रॉडक्टस आपण सरसकट वापरत नाही तसेच पुर्ण माहिती घेतल्याशिवाय काही होम रेमेडीजचा वापर करू नये. लोक आजकाल सोशल मीडियावर चालणारे ट्रेंड फॉलो करतात. यात दाखवल्या जाणाऱ्या स्कीन केअर टिप्स विचार न करता करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करा पण ते करण्याआधी त्याविषयीची योग्य आणि पुर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा संपुर्ण माहिती नसल्याने लोकांना फायदा होण्याऐवजी नुकसानच होते.

हेही वाचा: टॅटूचा ट्रेंड न्यारा

इथे आम्ही तुम्हाला अशा काही होम रेमेडीज विषयी सांगणार आहोत ज्याचा वापर विचार न करता करू नये.

बेकिंग सोडा

लोक स्कीन केअरमध्ये उत्तम रिझल्टस मिळावे म्हणून बेकिंग सोडादेखिल वापरतात. बेकिंग सोड्याच्याबाबत हे मिथ आहे की, त्यामुळे पिंपल्स किंवा एक्ने जातात. मात्र असे मानले जाते की, यामुळे त्वचेचा पीएच बिघडतो. त्यामुळे हे स्कीनवर डायरेक्ट लावल्यावर त्वचा ड्राय व निश्तेज होते.

टूथ पेस्ट मास्क

लोक ऑयली स्कीनचा प्रॉब्लेम कंट्रोल करण्यासाठी टूथपेस्ट वापरतात. प्रत्यक्षात मात्र हे हानिकारक ठरू शकते. यात अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे खाज सुटू शकते.

हेही वाचा: केक बेकिंग आणि चॉकलेट मेकिंग

लिंबूचा रस

त्वचेचा रंग सुधारण्यात व्हिटॅमीन सी महत्वाचे असते. लिंबू हा व्हिटॅमीन सी चा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे लोकांना वाटते की लिंबू लावल्याने स्कीन ग्लो करेल. या गैरसमजामुळे स्कीनवर रॅशेश, खाज किंवा पिंपल सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे लिंबू रस डायरेक्ट लावण्याऐवजी दुसर्या पदार्थांमध्ये मिक्स करून लावावे.

शुगर स्क्रब

स्कीनवर स्क्रबिंग करण्यासाठी काही लोक साखर वापरतात. पिठीसाखरेत लिंबू घालून त्वचेवर लावतात. साखर त्वचेवर हार्ड असल्याने त्वचा खरखरीत होऊ शकते. हे त्वचेसाठी हार्श सिध्द होऊ शकते. त्यामुळे ओट्स किंवा अन्य वस्तूचा साखरेऐवजी वापर करावा. या वस्तू वापरतांनाही आधी त्याची पुर्ण माहिती घ्या.

हेही वाचा: लिंबू मिरची लावण्यामागे अंधश्रद्धा नाही तर एक वैज्ञानिक कारण देखील आहे

Web Title: Do Not Use Home Remedies Without Full Information For Skin Care

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..