मुंबई : प्राचीन कला, इतिहास आणि सांस्कृतिक वारसा जाणून घेण्याची इच्छा असेल तर संग्रहालयांना भेट देणे महत्त्वाचे आहे. संग्रहालयांना प्रत्यक्ष भेट देणे शक्य न झाल्यास घरबसल्याही आभासी भेट देणे शक्य आहे.
तुम्ही घरबसल्या कोलकात्याच्या इंडियन म्युझियमच्या प्रत्येक मजल्यावर फेरफटका मारू शकता. एवढेच नाही तर लंडनच्या ब्रिटीश म्युझियममधील मौल्यवान वस्तू पाहू शकता. हे सर्व शक्य आहे google arts and culture या अॅप आणि संकेतस्थळामुळे. या माध्यमातून तुम्ही केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील संग्रहालयांमध्ये फेरफटका मारू शकता.
पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस १८ मे १९८३ साली साजरा करण्यात आला होता. नागरिकांना संग्रहालयांप्रती जागरूक करणे हा यामागील उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषद या दिवसाचे आयोजन करते. कोलकात्याचे इंडियन म्युझियम हे सर्वांत जुन्या संग्रहालयांपैकी एक आहे. त्याची स्थापना १८१४ साली झाली होती.
संग्रहालयाला आभासी भेट देतानाही प्रत्यक्ष भेट दिल्यासारखाचा अनुभव येतो. गुगल आर्ट्स अॅण्ड कल्चरवर जगभरातील संग्रहालये पाहाता येतात. प्रत्यक्ष भेट दिल्यावर ज्याप्रकारे आपण संग्रहालयात फेरी मारतो व तेथील मौल्यवान वस्तू जवळून पाहातो, तसाच अनुभव गुगल आर्ट्स अॅण्ड कल्चरमध्येही घेता येतो.
हा अनुभव घेण्यासाठी गुगल आर्ट्स अॅण्ड कल्चर अॅप डाऊनलोड करावे किंवा artsandculture.google.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथे कलाकार, माध्यम, आर्ट मूव्हमेंट, संग्रहालय अशा निकषांनुसार वर्गवारी करण्यात आली आहे. येथे कलाकृतींचा संग्रह करून तो नंतर पाहण्याची सोयही आहे.
संग्रहालयातील कलाकृती झूम करून बघण्याची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. एका दालनातून दुसऱ्या दालनात जाता येते. तुम्ही घरीच असाल तरीही प्रत्यक्ष संग्रहालयात असल्याचा भास होतो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.