Face Pull Exercise For Shoulder : फेस-पुल अप करताना अशी घ्या काळजी, होईल फायदाच फायदा

या प्रकारात हात आणि खांद्याच्या मदतीने शरीर वरच्या दिशेने ओढले जाते
Face Pull Exercise For Shoulder
Face Pull Exercise For Shoulderesakal

Face Pull Exercise For Shoulder : पुल म्हणजे 'खेचणे' आणि अप म्हणजे 'वर' म्हणजेच, असा व्यायाम प्रकार ज्यामध्ये हात आणि खांद्याच्या मदतीने शरीर वरच्या दिशेने ओढले जाते. त्याला पुल-अप असे म्हणतात. हा व्यायाम तुमचे बायसेप्स, अपर बॅक, मिडल बॅक, लोअर बॅक, लेट्स  आणि खांद्यावर मुख्यत्वे काम करते.

याच व्यायाम प्रकारातील एक वेगळा प्रकार आपण आज पाहणार आहोत. तो म्हणजे फेस पुल अप. फेस-पुल व्यायाम हा देखील खांद्याचा व्यायाम आहे. जे खूप महत्वाचे आहे, कारण जे काम इतर व्यायाम करू शकत नाहीत ते ते करतात. परंतु बऱ्याच लोकांना हे करण्याचा योग्य मार्ग माहित नसतो. ते चुकीचे करण्यात काहीच फायदा नाही.

Face Pull Exercise For Shoulder
Exercise Tips : रोजच्या व्यायामाला पडतेय दांडी ? मग हे करा

फिटनेस एक्सपर्टनी फेस ब्रिज एक्सरसाइज दरम्यान झालेल्या चुकीबद्दल सांगितले. ही चूक आसनाशी संबंधित आहे. अनेकदा लोक पुल मशीनची दोरी पकडून घशाकडे खेचतात. ही कृती चुकीची आहे, ज्याचा पुरेपूर फायदा होत नाही.

हा खांद्याचा व्यायाम करण्यासाठी केबल पुली मशीनची आवश्यकता असते. त्यामुळे ते जिममध्ये करणे सोयीचे आहे. मात्र आपल्या घरात एकच केबल पुली मशिन असली तरी हा व्यायाम आरामात करता येतो.

Face Pull Exercise For Shoulder
Benefits of Exercise: हेल्थ वेल्थ - व्यायाम न केल्यास काय होईल?

कसे करावे वर्कआऊट

  • प्रथम, डोक्याच्या वर पुली मशीन सेट करा.

  • आता दोरी पकडून मशीनपासून इतके दूर जा की आपले हात पूर्णपणे ताणले जाऊ शकतात.

  • मग वजन गुडघ्यावर आणून थोडे मागे वाकवा.

  • आता खांद्याचा मागचा भाग ऍक्टीव्ह करा आणि दोरी कपाळाकडे खेचून घ्या.

  • असे १५ सेट करा.

काय आहे फायदा

बहुतेक एक्सरसाइज फ्रंट आणि मीडियम डेल्ट्स परिणाम करतात. ज्यामुळे रियर डेल्ट कमकुवत राहतो आणि जिम करून कंबरेवर परिणाम व्हायला लागतो. फेस-पुल व्यायामामुळे ही कमतरता दूर होते आणि पाठीला हेवी लुक मिळतो.

Face Pull Exercise For Shoulder
Joint Military Exercises : 'एएफइंडेक्स २०२३' हा संयुक्त लष्करी सराव होणार पुण्यात

या चुका टाळा

  • हा व्यायाम करताना काहीजण त्यांची हनुवटी रॉडवर घेत नाहीत, ही एक फार मोठी चूक आहे. जर तुम्ही हनुवटी रॉडवर घेतली तर तुम्हाला जास्त फायदा मिळू शकेल.

  • अनेक लोक पुल-अप खूप पटपट करतात. त्यामुळे हा व्यायाम करताना तुम्ही तुमचा स्पीड हा सामान्य ठेवा, खूप जोरात करु नका ही बाब लक्षात ठेवा.

  • हा व्यायाम जोरात किंवा पटपट केल्याने स्नायूंची इंगेजमेंट कमी होते आणि तुम्हाला अधिक लाभ मिळत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com