Gardening Tips : ‘चंपा,चमेली की जाई अबोली...’ कोणती झाडे लावल्याने अंगणात होतो सापांचा सुळसुळाट ?

चंदनाच्या झाडावर जास्त साप राहतात कारण ते सुगंधी झाड आहे
Gardening Tips
Gardening Tipsesakal

Gardening Tips :  

घराशेजारी, अंगणात आणि बाल्कनीत आपण अनेक प्रकारची झाडे लावतो. काही सुगंधी फुलांची, फळांची, काही शोभेची झाडे लावतो. त्यामुळे घराशेजारी असलेल्या या झाडांमुळे सावली तर मिळतेच सोबत उन्हाळ्यातही थंडगार हवा मिळते. झाडांचे अनेक फायदेही आपल्याला होतात.

फुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक प्रकारची शोभेच्या फुलांची झाडं घराच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात. या फुलांचा गजरा करण्यासाठी देवाला घालण्यासाठी उपयोग होतो. पण घरात अंगणात काही फुल झाडे लावणे आपल्यासाठी डोकेदूखी ठरू शकते.

कारण, घरी लावलेल्या काही फुलांच्या सुगंधाने घराशेजारी सापांचे घर बनते. साप त्या फुलांच्या वासाने घराकडे येतात असे सांगितले जाते. ती कोणती फुल झाडे आहेत हे पाहुयात.

Gardening Tips
Tata Semiconductor Plant : भारतात सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी 'टाटा'ला ग्रीन सिग्नल; गुजरातमध्ये उभारणार पहिला प्लांट

चंदनाचे झाड

चंदनाच्या झाडावर जास्त साप राहतात कारण ते सुगंधी झाड आहे. ते चमेली आणि कुंद्याच्या भोवती अधिक राहतात. सापांनाही राहण्यासाठी थंड, सुवासी ठिकाणे आवडतात. शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी ते चंदनाच्या झाडांभोवतीही राहतात. चंदनाचा शीतल प्रभाव असतो, त्यामुळे तुम्हाला या झाडावर साप नक्कीच दिसतील.

लिंबाचे झाड

तुम्हाला माहीत आहे का की लिंबाचे झाड असे झाड आहे. जिथे सापांना राहायला आवडते? लिंबाच्या झाडांना वास नसतो. पण, हे आंबट फळ कीटक, उंदीर आणि पक्षी खातात त्या किटकांचे घर त्याच्यावर असते. या किटकांची, छोट्या पक्षांची शिकार करण्यासाठी सापही येथे घिरट्या घालतात. त्यामुळेच, या झाडावर सापांचे घर असते.

Gardening Tips
Rosemary Plant: रोझमेरी रोपाची चांगली वाढ होण्यासाठी काय करावे?

देवदाराचे झाड

देवदाराची झाडे घनदाट जंगलात आढळत असली तरी ती बरीच मोठी आहेत. यामुळे सापांना सावली मिळते आणि त्यांना थंडपणाची अनुभूतीही मिळते. त्यामुळे, या झाडावर सापही राहतात. त्यामुळे तुमच्या घराजवळ देवदाराचे झाड असेल तर सांभाळून रहा.

क्लोव्हर प्लांट

ही वनस्पती जमिनीपासून फार उंच वाढत नाही. क्लोव्हर प्लांटला क्लोव्हर, ट्रेफॉइल असेही म्हणतात. जमिनीच्या अगदी जवळ असल्याने साप सहजपणे त्याखाली लपून विश्रांती घेतात. सहजपणे याच्या खाली येतात आणि सुरक्षित राहतात.

Gardening Tips
Paras Thermal Power Plant: पारस औष्णिक वीज केंद्राचा नवा विक्रम, २५० दिवसांपासून दिला अखंडित वीज पुरवठा

मोगरा

सापांनाही या वनस्पतीच्या आसपास राहायला आवडते. ही एक छायादार वनस्पती आहे. सुख, समृद्धी, सकारात्मकता आणण्यासाठी आणि घराला सुगंधित ठेवण्यासाठी अनेक लोक चमेलीचे रोप लावतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com