Reverse Hair Washing Trick खरंच केसांसाठी फायदेशीर आहे का?

ही ट्रिक वापरून पहायला काय हरकत आहे
Reverse Hair Washing Trick
Reverse Hair Washing Trickesakal

Reverse Hair Washing Trick : आठवड्यातून तीन वेळा केसांना शॅम्पू वॉश करावंच लागतं. कारण, प्रवासामुळे केसांच्या मुळाशी बसलेली धुळ स्वच्छ करण्यासाठी शॅम्पू गरजेता असतो. पण, सतत केमिकल वापरल्याने केस रूक्ष होतात. आणि जीव गेल्यागत दिसू लागतात. 

यावर शॅम्पू वापरू नये असा सल्ला आम्ही देत नाही. पण, त्याचे प्रमाण किती असावे हे आपल्या हातात आहे. बरं तो कसा लावला जातो यावरही केसांचे रूक्ष होणं अवलंबून असते.

आपल्याला आपले केस धुवावे लागतात. तेव्हा आपण प्रथम केसांना तेल लावतो, नंतर केसांना शॅम्पू करतो. शॅम्पू केल्यानंतर ओल्या केसांना कंडिशनर लावतो. काही वेळाने केस धुवून पुसून टाकतो.

Reverse Hair Washing Trick
Hair Fall : मेथीचे पाणी केस गळतीवर रामबाण उपाय आहे, जाणून घ्या कसे वापरावे
केसांना शॅम्पू करणे गरजेचे पण...
केसांना शॅम्पू करणे गरजेचे पण...esakal

केसांची निगा राखण्याची ही सर्वसामान्य दिनचर्या म्हणता येईल. पण, तुम्हाला रिवर्स वॉशिंग पद्धत माहीत आहे का? रिवर्स वॉशिंगमध्ये आपण आधी केस ओले करतो, नंतर केसांना कंडिशनर लावून थोडा वेळ मसाज आणि त्यानंतर केस शॅम्पूने स्वच्छ करणं. यापद्धतीनं तुम्ही कधी केस धुतलेत का? असे आपण जेव्हा उलटे केस धुतो तेव्हा त्याला रिवर्स वॉशिंग पद्धत म्हणतात.

जेव्हा तुम्ही तुमचे केस कंडिशनिंग करण्यापूर्वी शॅम्पू करता तेव्हा तुमच्या डोक्याच्या त्वचेवरील घाम आणि घाण काढून टाकणे सोपे होते. परंतु, यामुळे अनेक वेळा नैसर्गिक तेलही तुमच्या केसांमधून निघून जाते आणि केसांमध्ये ओलावा कमी होतो. त्यामुळे केस कोरडे होऊ शकतात.

Reverse Hair Washing Trick
Hair Care : केस गळत असल्यास करा हे उपाय

यासाठी ही ट्रिक येईल कामी

तुम्ही केस कंडिशनरने रिहायड्रेट करा. पण अनेक वेळा कंडिशनर लावल्यानंतर ते केसांना चिकटून राहते आणि केसांना प्रॉब्लेम्स होऊ लागतात. इतकेच नाही तर यामुळे केस अधिक तेलकट होऊ शकतात. जर तुमचे केस कोरडे, पातळ आणि तेलकट असतील तर तुम्ही ही पद्धत अवश्य वापरून पहा.

Reverse Hair Washing Trick
Hair Care: केसगळती थांबवायचीय, दाट केस हवेत तर या गोष्टींचा आहारात करा समावेश

केस रिवर्स वॉशिंग धुण्याचे फायदे -

जेव्हा तुम्ही शॅम्पुपूर्वी केसांना कंडिशन करता, ते तुमच्या केसांसाठी प्राइमिंग म्हणून काम करते. केसांच्या क्युटिकल्सचे योग्य पोषण करून आणि केसांवर संरक्षणात्मक थर तयार झाल्यानं शॅम्पूमुळे तुमच्या केसांमधील नैसर्गिक तेल निघून जावू शकत नाही.

तुम्ही प्रथम कंडिशनर लावाल तेव्हा तुमचे क्युटिकल्स देखील मॉइश्चरायझर शोषून घेतात. रिवर्स वॉशिंग केल्याने केसांना चांगल्या पद्धतीनं हायड्रेट करता येतं.

तुमचे केस चमकदार, मऊ आणि निरोगी होतात. केसांमध्ये जी काही घाण उरली आहे ती कंडिशनिंगनंतर शॅम्पूने स्वच्छ केली जाऊ शकते.

खरे तर केसांमध्ये कंडिशनर राहिल्यास केसांचा पोत कमकुवत होतो. जर तुमचे केस कोरडे, पातळ आणि तेलकट असतील तर तुम्ही ही पद्धत अवश्य वापरून पहा.

कंडिशनर लावून केसांवर कृत्रिम तेलाचा थर तयार होतो. त्यामुळे केस लवकर तेलकट दिसू लागतात. यानंतर केसांची नैसर्गिक चमकही संपते. त्यामुळे केस निर्जीव होतात.

Reverse Hair Washing Trick
Hair Care: केसगळती थांबवायचीय, दाट केस हवेत तर या गोष्टींचा आहारात करा समावेश

कसे लावायचे

  • सर्वात आधी केस ओले करा

  • त्यावर कंडिशनर लावा

  • मिनीटभर थांबून मग केसांवर शॅम्पू लावा

  • कंडिशनरवरच शॅम्पू चांगल्या पद्धतीने लावून घ्या

  • त्यानंतर केस धुवून टाका

Reverse Hair Washing Trick
Hair Care Tips : केसांच्या वाढीसाठी तेल लावून उपयोग नाही; हे सुपर फुड खा आणि कमाल बघा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com