Lifestyle : ऐन पस्तीशीत म्हातारं व्हायचं नसेल तर फॉलो करा 'या' ७ टिप्स

बरेच लोक ऐन ३५-४० शीत स्वतःला म्हातारे समजू लागतात आणि आयुष्य जगण्याची उत्साही वृत्ती कमी होत असेल तर या टिप्स फॉलो करा.
Lifestyle
Lifestyleesakal

Enjoy the Life : जर तुम्ही वयाच्या ३५-४०शीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हा पडाव प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. पण इथवर येताना लोक स्वतःला इग्नोर करायला सुरूवात करतात. या वयात आल्यावर आपले चांगले दिवस मागे पडलेत अशी भावना निर्माण होते. स्वतःला म्हातारे समजू लागतात आणि आयुष्य जगण्याची उत्साही वृत्ती कमी होते. पण असे करू नये. उलट आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याचा आनंद घ्यावा. त्यासाठी फॉलो करा या टिप्स

Lifestyle
PM Modi Lifestyle: 72 वर्षाच्या वयातही पीएम मोदी आहेत अगदी फिट; काय आहे त्यांचं फिटनेस सिक्रेट?

आपण सर्वज्ञ आहोत असे न समता नवीन गोष्टी शिका

तुमचे शिक्षण संपले आणि तुम्ही बऱ्याच डिग्रीज घेतलेल्या असल्या तरी आपल्याला सगळे ज्ञान मिळाले आणि आता अजून शिकण्याची गरज नाही असे समजू नये. जगात सर्वच माहित असेल असे कोणीही नाही. त्यामुळे नवीन काही शिकण्याची तयारी ठेवावी. एखादी गोष्ट माहित नसेल तर ती शिकण्यात कोणताही कमीपणा वाटून घेऊ नये. त्यातून नवी प्रेरणा, उत्साह मिळतो.

Lifestyle
Lifestyle: सकाळी लवकर जाग येण्यासाठी 'या' तीन गोष्टी आचरणात आणा

मनाविरूध्द काम/नोकरी करणे टाळावे

जर तुम्ही करत असलेले काम, कामाचे ठिकाण आवडत नसताना केवळ पैसे किंवा सुविधा मिळतात म्हणून काम करू नये. अशा कामातून आनंद मिळत नाही. पैसे थोडे कमी मिळाले तरी चालेल पण तुम्ही आनंदी राहणे अधिक गरजेचे आहे.

Lifestyle
Healthy Lifestyle: वजन कमी करायचं? जेवणात 'या' भाज्यांचा समावेश करा

आळसावलेली लाइफस्टाईल सोडा

आपली बहुतांश दिनश्चर्या बैठ्या कामाची असते. ३० नंतर मेटॅबोलिझम कमी होते. त्यामुळे शरीर शेपमध्ये ठेवणे कठीण होते. त्यामुळे आपल्या जीवनशैलीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Lifestyle
Lifestyle Tips: घरच्या घरी बनवा नीम साबण

आपली स्वप्न जपायला शिका

तुम्ही ३५-४० वर्षांचे झाले आहात म्हणजे तुम्ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू नये असे नाही. उलट तुमचा अनुभव हा तुमचे जग बदलण्यास मदतीस येते.

Lifestyle
Healthy Lifestyle: जास्त Stress नी वजन घटतं? रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा

मित्र व कुटुंबापासून दूर होऊ नये

बिझी शेड्यूलमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क कमी होतो. पण या संपर्क टिकवणे आवश्यक असते. जवळच्या लोकांच्या संपर्कात रहावे, सोशल सर्कल वाढवावे.

Lifestyle
Healthy Lifestyle: तुम्ही रात्री जेवण उशीरा करता? हे वाचाच..

भविष्यावर फोकस करा

जुन्या यशांना उगाळत बसण्याऐवजी अजून कसे यश मिळवता येईल याकडे लक्ष द्यावे. तुम्ही आधी काय करून ठेवले आहे याच्याशी कोणाला संबंध नसतो. उलट तुम्ही पुढे काय करतात यात सगळ्यांना इंटरेस्ट असतो.

वाईट सवयी सोडाव्या

वयाच्या ३०शीनंतर सतत फास्ट फूड खाणे, दारू पिणे, धूम्रपान करणे, पुरेशी झोप न घेणे या सवयी बदलायला हव्यात. या वयात मेटॅबोलिझम कमी झालेले असल्याने शरीरात स्फूर्ती देणाऱ्या गोष्टी करणे गरजेचे असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com