Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीच्या एकादशीला खिचडी नको तर मेदु वडे बनवा, उपवास नसलेले लोकही ताव मारतील

वड्यासोबत बनवा चटकदार चटणी जी उपवासाची चव वाढवेल
Mahashivratri 2024
Mahashivratri 2024esakal

Mahashivratri 2024 : फेब्रूवारी-मार्च महिन्यात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधार महत्त्व आहे. कारण, या एकादशीला भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. या एकादशीला महाशिवरात्री असेही म्हटले जाते. महाशिवरात्री दिवशी उपवास करून तो दुसऱ्यादिवशी सोडतात.

महाशिवरात्री दिवशी उपवासाला साबुदाण्याची खिचडी खाल्ली जाते. सर्वत्रच पारंपरिक पदार्थ आवडीने केले जातात. तुम्हीही उद्या एकादशीचा उपवास करणार असाल तर आम्ही आज एक भन्नाट रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे.

Mahashivratri 2024
Mahashivratri 2023 : दोन दिवसाच्या सलगच्या उपवासाने अॅसिडिटी झालीये? ट्राय करा हा पदार्थ!

उपवासादिवशी तूम्ही मेदु वडा खाऊ शकता. होय,खरंच तुम्ही मेदुवडा खाऊ शकता पण अट इतकीच आहे की तो आम्ही सांगतिलेल्या पद्धतीने असावा. तर ही पद्धत कोणती ते पाहुयात.

साहीत्य

  • बटाटे २

  • रताळे १

  • शेंगदाण्याचा बारीक कूट २ चमचे  

  • कोथंबिर

  • मीठ चवीनूसार

  • मिरच्या १ चमचा

  • साबुदाण्याचे पीठ २ चमचे

  • तळण्यासाठी तेल

Mahashivratri 2024
Mahashivratri Rangoli Designs 2024 : महाशिवरात्रीला करा शंकर-पार्वतीचे स्वागत, अंगणात काढा ‘या’ सोप्या आणि आकर्षक रांगोळ्या

कृती

  • उपवासाचे मेदु वडे बनवण्यासाठी सर्वात आधी बटाटे आणि रताळे स्वच्छ धुवून कुकरला लावावेत.

  • कुकरमधून एक शिट्टी काढून रताळे-बटाटे थंड करून घ्यावेत.

  • आता बटाटे आणि रताळे किसून घ्यावे. त्यात वरील सर्व साहीत्य, कोथंबीर, कूट, मीठ, मीरच्या, साबूदाण्याचे पीठ घालून घ्यावे.

  • आता हे तयार पीठ एकजीव करून घेऊन त्याचे गोळे बनवावे.

  • गोळे बनवून त्याला मेंदूवड्याचा आकार द्यावा.

  • त्यानंतर तापलेल्या तेलात हे वडे तळून घ्यावेत.

  • मंद फ्लेमवर हे वडे तळून घ्यावेत, ज्यामुळे वडे कुरकुरीत होतात.

Mahashivratri 2024
Mahashivratri 2024 : देशातील ‘या’ ठिकाणी आहेत महादेवाच्या सर्वात मोठ्या मूर्ती, महाशिवरात्रीनिमित्त एकदा नक्की द्या भेट

चटणी

मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, कोथंबीर,मीठ आणि मिरची घ्यावी. हे बारीक करून घ्यावे. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे. त्यामुळे हवी तितकी पातळ चटणी बणवता येते. त्यात तुम्ही साखरही घालू शकता. ज्यामुळे चटणीला गुळचटपणा येतो.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com