जीवनात यशस्वी होण्यासाठी 'या' सात सवयी जाणून घ्या

हिंदू धर्मानुसार यशाच्या मार्गावर जाणाऱ्या मुख्य सात सवयी आहेत.
7 Hindu Habits of Success
7 Hindu Habits of Successsakal

सवय ही एखाद्या व्यक्तीसाठी जीवन संहिता असू शकते. या सवयींना आपण संस्कार, कर्तव्य, धर्म इत्यादी विविध नावांनी ओळखतो. हिंदू धर्म शतकानुशतके विकसित झालाय. हिंदू संस्कृती ही जगातील सर्वात जुनी आणि समृद्ध संस्कृती आहे. हिंदुची जीवन संहिता जगापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी हिंदू समाजाची आहे.

हिंदूची सर्वोत्कृष्ट जीवन संहिता दैनंदिन सवयी म्हणून आत्मसात केली जाते. या दैनंदिन सवयी प्रत्येकाने यशस्वी आणि आनंदी राहण्यासाठी पाळल्या पाहिजेत. ही मूल्ये प्रत्येकाने दैनंदिन जीवनात समाधानी जीवनासाठी आत्मसात केली गेली पाहिजे. (core seven habits of success as per Hinduism.)

7 Hindu Habits of Success
Diary Writing : तुम्हीही लावा डायरी लिहिण्याची सवय, जाणून घ्या फायदे

हिंदू धर्मानुसार यशाच्या मार्गावर जाणाऱ्या मुख्य सात सवयी खालीलप्रमाणे आहेत.

१. सूर्योदयाच्या आधी उठणे

हिंदू धर्मात यशस्वी होण्यासाठी सुचवलेली पहिली आणि प्रमुख सवय म्हणजे सूर्योदयापूर्वी उठणे. ज्यांना आयुष्यात यश मिळवायचे आहे त्यांनी सूर्योदयापूर्वी अर्धा तास उठावे. ही शांततेची वेळ आहे, ज्यामध्ये कोणीही त्यांच्या जीवनाच्या उद्देशाचे ध्यान करू शकतात.

२. जीवनाचा उद्देश निश्चित करणे

हिंदू सवयींचे जीवन-उद्दिष्ट चार भागांमध्ये आधारित आहेत, धर्म, अर्थ, कर्म आणि मोक्ष. यावरुन जीवनाचा उद्देश निश्चित करणे गरजेचे आहे.

7 Hindu Habits of Success
Photo Story: उन्हाळ्यात करा काहीतरी हटके! कला शिबिराने सुट्टी होईल यादगार

३. ध्यान

आपला दिवस सुरू करण्यासाठी, तणावाचा सामना करण्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे ध्यान होय.ध्यान हा तणाव दूर करण्याचा आणि स्वतःला समस्यांपासून मुक्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

४. योग्य आणि पौष्टीक खा

जगाला हिंदू धर्मातील अन्न आणि आहारविषयक नीतिमत्तेची झपाट्याने जाणीव होत आहे, जी रोजच्या जीवनात सुदृढ राहण्यासाठी आवश्यक आहे. साधे आणि पौष्टिक अन्न घेणे ही हिंदूंची सवय आहे, जी संपुर्ण जगाने स्वीकारणे आवश्यक आहे.

7 Hindu Habits of Success
Parenting Tips: उन्हाळ्यात मुलांच्या आहारावर ठेवा लक्ष! फॉलो करा या टिप्स

५. शारीरिक व्यायाम

कार्यक्षमता आणि व्यायाम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यशस्वी लोकांना दररोज व्यायाम करायची सवय असते. हिंदू सवयींनुसार, योग केल्याने शरीराद्वारे मन नियंत्रित ठेवणे सोपी जाते. योग ही हिंदू धर्माची जगाला मिळालेली सर्वोत्तम सवय म्हणजेच देणगी आहे.

६. इतरांच्या ऐवजी स्वतःशी स्पर्धा करा

हिंदू संस्कृती इतरांना मागे टाकण्याऐवजी स्वत: ला बाहेर पडण्याची सवय सुचवते. इतरांच्या ऐवजी स्वत:शी स्पर्धा करा आणि पुढे जा, असे मुल्य जपणे, ही आपल्यासाठी उत्तम सवय आहे.

7 Hindu Habits of Success
घरात चप्पल वापरणं योग्य आहे का? शूज काढण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या

७. ध्येयावर लक्ष केंद्रीत असणे

ध्येयावर लक्ष केंद्रीत असणे ही सवय यशाच्या सर्वोत्तम सवयींपैकी एक आहे. जेव्हा तुम्ही निवडलेल्या कामाच्या किंवा विचारांच्या प्रवाहात स्वतःला सामावून घेता, त्यावर लक्ष केंद्रीत करता तेव्हा तुम्ही तुमच्या यशाच्या आणखी जवळ येता. त्यामुळे या सवयीला आत्मसात करणे, खुप गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com