Diary Writing : तुम्हीही लावा डायरी लिहिण्याची सवय, जाणून घ्या फायदे

अनेकांना आपल्या मनातील गोष्टी उघडपणे कोणाबरोबरही सांगता येत नाहीत किंवा शेअर करता येत नाहीत.
Diary Writing Benefits in Marathi, good habits for daily routine
Diary Writing Benefits in Marathi, good habits for daily routineesakal
Summary

अनेकांना आपल्या मनातील गोष्टी उघडपणे कोणाबरोबरही सांगता येत नाहीत किंवा शेअर करता येत नाहीत.(Diary Writing Benefits)

अनेकांना आपल्या मनातील गोष्टी उघडपणे कोणाबरोबरही सांगता येत नाहीत किंवा शेअर करता येत नाहीत. अशावेळी डायरी लिहिण्याची (Diary Writing) सवय तुम्ही अंगीकारु शकता. कित्येकदा मनात दडलेलं किंवा एखादी गोष्ट जेव्हा आपण कुणाला सांगू शकत नाही, तेव्हा अनेकदा आपण ते डायरीमध्ये लिहितो. त्याचबरोबर आपल्या मनातील गोष्टी लिहून ठेवल्याने मनाची वेदना बऱ्याच अंशी कमी होते, अशी अनेकांची धारणा असते.कदाचित म्हणूनच अनेकांना दैनंदिन जीवनाबद्दल डायरी लिहायला आवडते. डायरी लिहिण्याची सवय बऱ्यापैकी चांगली मानली जाते.दिवसभर त्यांच्यासोबत काय घडतंय हे प्रत्येकाने डायरीत लिहून ठेवलं पाहिजे. दिवसभरात तुम्ही काय केलं, दिवसभरात काय मिळवलं आणि काय गमावलं, हे यात दाखवण्यात आलं आहे. यामुळे तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर नजर ठेवू शकाल. चला तर मग डायरी लिहिण्याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊयात.

Diary Writing Benefits in Marathi, good habits for daily routine
Parenting Tips: उन्हाळ्यात मुलांच्या आहारावर ठेवा लक्ष! फॉलो करा या टिप्स

डायरी लिहिण्याचे फायदे...

तुमच्या मनातलं बोलू शकाल-

बहुतेक लोक इच्छा असूनही त्यांच्या मनातील बोलू शकत नाहीत. त्याचबरोबर अनेक जण कोणत्याही प्रकारच्या भीतीपोटी किंवा लाजून समोरच्या व्यक्तीशी बोलू शकत नाहीत, तर अनेक जण भीतीचेही बळी ठरतात. अशा वेळी दैनंदिन जीवनात डायरी लिहिण्याची सवय लावली तर आपल्या मनातील भावना किंवा गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे लोकांना सांगता येतील किंवा शेअर करता येतील.

एकटेपणातून होईल सुटका-

आजच्या धकाधकीच्या डिजिटल जीवनात लोकांना वेळ फारच कमी पडतोय. अशावेळी तुमचं म्हणणं ऐकून घेणारा किंवा वेळ देऊ शकेल असं कुणी नसेल तर डायरी लिहायची सवय लावून घ्या. डायरी लिहिल्याने तुमचा एकटेपणा बऱ्याच अंशी कमी होईल आणि त्यात तुम्ही तुमच्या मनातील विचार शेअर करू शकाल.

Diary Writing Benefits in Marathi, good habits for daily routine
घरात चप्पल वापरणं योग्य आहे का? शूज काढण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या

गोष्टी लक्षात ठेवणे सोपे जाईल-

तुमचं प्रोफेशनल लाइफ (Professional Life) असो किंवा पर्सनल लाइफ (Personal Life) असो, अनेकदा अशा अनेक गोष्टी खटकत असतात ज्या चुकतात. वाढदिवस (Birthday)असो किंवा लग्नाचा वाढदिवस, ऑफिस (Office) असो किंवा घरातील एखादा मोठा कार्यक्रम असो किंवा मीटिंग (Meeting) असो, लोक या गोष्टी अनेकदा विसरतात. अशा परिस्थितीत डायरीतील प्रत्येक छोटी-छोटी गोष्ट लिहायला सुरुवात केली की गोष्टी लक्षात राहतात. गोष्टी विसरलात तरी मग डायरी पुन्हा वाचून तुमची आठवण ताजी होईल आणि तुम्हाला सगळं आठवेल.

भाषेवर पकड राहील-

मोबाइल (Mobile) आणि लॅपटॉपच्या (Laptop)या जगात अनेक वेळा आपण चुकीचे आणि छोटे छोटे शब्द लिहायला सुरुवात करतो आणि टायपिंगमुळे अनेकांना आपली लेखनाची सवयही सुटते. विद्यार्थ्यांसाठी हे खूप वाईट ठरू शकतं. अशा परिस्थितीत डायरी लिहिण्यामुळे भाषेवर पकड राहील. तसेच तुमची लिहिण्याची सवयही सुरु राहिल.

Diary Writing Benefits in Marathi, good habits for daily routine
Sex Education : पुरुषांना आवडत नाहीत या पाच 'लैंगिक क्रिया'

गोष्टींवर लक्ष केंद्रित कराल-

बरेचजण दिवसाला अनेक संकल्प करतात, पण त्यातील किती जण पूर्ण करू शकतात. याचे कारण असे की आपण बऱ्याचदा गोष्टी विसरतो आणि त्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टीही विसरुन जातात. जर तुम्ही तुमची ध्येयं डायरीत लिहिलीत, तर जेव्हा जेव्हा तुम्ही डायरी वाचता, तेव्हा तेव्हा तुम्हाला तुमचं ध्येय लक्षात राहील आणि यामुळे तुम्हाला गोष्टींवरही चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com