
Smart Shapewear To Accentuate Your Body : वजन कमी करण्यात वेळ जातो. तशी मेहनतही करावी लागते. थोडा व्यायाम, डाएटिंग, ट्रेडमिल, योगा करून त्वरीत वजन कमी होईल असे वाटत असेल तर हा विचार सोडून द्या. अनेक महिलांना असेही वाटत असेल की, एखादा चमत्कार व्हायला हवा आणि त्या स्लीम व्हाव्यात. पण, काही वेळापुरते स्लीम होण्यासाठी एक चमत्कार करण्यात आला आहे. त्याचे नाव बॉडीशेपवेअर असून ते काही वेळासाठी तूम्हाला स्लीम बनवू शकते.
फेस्टीव्ह सिझनमध्ये नवे ड्रेस, साड्या घालताना सुटलेले पोट लपवण्यासाठी बॉडीशेपवेअर तूम्हाला नक्की मदत करतो. त्यामुळे तूमच्या शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. साडी, वनपीस, शॉर्ट्स यासाठी वेगवेगळे बॉडीशेपवेअर उपलब्ध आहेत. ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते पाहुयात.
कोरसेट
काही ड्रेस असे असतात की, ज्यामध्ये तुम्हाला फक्त तुमची कंबर आकर्षक असणे गरजेचे असते. कोरसेट हा बॉडीशेपवेअरचा प्रकार फक्त त्यासाठी काम करतो. पूर्वीच्या काळीदेखील हे अशा प्रकारचे बॉडीशेपवेअर होते. आता यातील अॅडव्हान्स प्रकार पाहायला मिळतात. चांगल्या मटेरिअलमध्ये आणि कम्फर्टेबल असे हे बॉडीशेपवेअर असतात. त्यामुळे तुम्हाला फार काळजी करण्याची गरज नसते.
फुल बॉडीसेट
हा स्लीपसारखा प्रकार आहे. तुमची कंबर, पाठ या ठिकाणी अपेक्षित असलेला आकार तुम्हाला देतो. आता हा आकार देताना तुम्हाला श्वास घेण्याची भीती वाटत असेल तर हे बॉडीशेपवेअर स्तनांच्या भागाकडून मोकळे असतात. यांचे काम तुमच्या कमरेचे फॅट, पोट यांना कव्हर करुन चांगला लुक देतो.
साडीसाठी बॉडीशेपवेअर
हा नवा प्रकार सध्या बॉडीशेपवेअरमध्ये पाहायला मिळत आहे. साडी किंवा लाँग टाईट स्कर्टमध्ये तुम्हाला अपेक्षित शेप हवा असेल तर तुम्ही हा बॉडीशेपवेअर वापरु शकता. साडी नेसताना हा बॉडीशेपवेअर घालून त्यावरच साडी नेसता येते.
पोटासाठी टकर
सुटलेले पोट त्रासदायक वाटते. त्यामुळे केवळ पोट लपवायचे असेल तर टमी टकर बॉडीशेपवेअर बेस्ट आहे. कारण हे फक्त तुमचे टमी पोर्शन कव्हर करते. टमी टकर एखाद्या पँटीप्रमाणे असते. पण त्याचा वेस्टकडी भाग मोठा असतो.
बॉडीशेपवेअर घालण्याआधी हे वाचा
हे काही बॉडीशेपवेअर आहेत जे तुम्ही नक्की वापरु शकता. पण 4 तासांहून अधिक काळ ते घालू नये. जर तुम्हाला यातील कोणतेही बॉडीशेपवेअर घातल्यानंतर अस्वस्थ वाटत असेल त्याचा वापर तिथेच थांबवा.
बॉडीशेपवेअर शॉर्ट
हे शॉर्ट्ससारखे बॉडीशेपवेअर आहे. जे तुम्ही तुमच्या मिनी ड्रेस किंवा स्कर्टच्या खाली वापरू शकता. यामुळे लुक खराब न होऊ देता छान एक्सपेरियन्स देते.
बम शेपवेअर
तुम्ही सिल्क स्लिप ड्रेस घातला असेल तर त्यावर हा शेपर वापरता येतो. तुमचा बम आकर्षक आकारात दिसण्यासाठी हे मदत करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.