मुलींनो, लग्नानंतर आईला सांगू नका पाच गोष्टी!कोणत्या ते वाचा

मुली नेहमी त्यांच्या भावना आईशी शेअर करतात
mother daughter
mother daughter

मुली नेहमी त्यांच्या भावना आईशी शेअर करतात. साहजिकच मुलींचे आईशी नाते अगदी जवळचे असते. वडिलांविषयी (Father) त्यांना धाक वाटत असल्याने त्या फारश्या गोष्टी वडिलांना सांगत नाहीत. म्हणूनच तर लग्नानंतरही (Marriage) आईशी बोलून अनेकींना आधार वाटतो. त्यामुळेच माहेरही जवळच वाटतं. मात्र तुमचं लग्न झालं की तुम्ही आईशी(Mother) काय बोलावं याबद्दल अनेक मतभेद आहेत. काही मुलीना (Daughter) आईला सर्व अडी-अडचणी सांगण्याचे स्वातंत्र्य असावे असे वाटते तर काहींना असे अजिबात होऊ नये असे वाटते. पण मुली आईला किती गोष्टी सांगाव्या किती नाही याविषयी सीमारेषा आखते. त्यानुसार किती बोलावे हे ठरवतेय या प्रकारामुळे मुलीचे आईवडील तिच्या संसारात ढवळाढवळ करत नाहीत. पण काही गोष्टी मुलींनी त्यांच्या आईला सांगू नयेत. असे केल्याने दोन्ही नातेसंबंध नीट बांधले जातील.

mother daughter
तिशीच्या आत लग्न कराल तर फायद्यात राहाल, वाचा ५ फायदे

रोज प्रत्येक गोष्ट सांगू नका

लग्नाच्या सुरूवातीच्या काळात माझी मुलगी आनंदी आहे ना? हा प्रश्न प्रत्येक आईच्या मनात असतो. त्यामुळे तुम्ही सुरूवातीला तुमचा दिनक्रम नक्की सांगा. पण जसा वेळ जाईल तसं हे सांगणं कमी व्हायला हवं. कारण जर तुम्ही रोजच काय घडतय ते सांगत राहिलात तर त्याचा समोरची व्यक्ती आक्षेप घेण्याची शक्यता आहे. किंबहुना तुमच्याविषयी संशय निर्माण होउ शकतो. जर सासूने स्वयंपाकघराची जबाबदारी तुमच्या जावेकडे आणि बाहेरच्या कामांची जबाबदारी तुमच्यावर दिली असेल तर तुमची आई त्याचा गैरअर्थ काढण्याची शक्यता असते. अशाने तुम्हालाही समस्या येऊ शकतात. म्हणून इतक्या बारीकसारीक गोष्टी आईला सांगणे टाळा.

mother daughter
एकला चलो रे... लग्न न करता सिंगल राहण्याकडे तरुणाईचा वाढला कल
Couple
Couple

नवऱ्याबरोबरचे भांडण

लग्नानंतर अनेक जोडप्यांमध्ये छोटे-मोठे वाद होतात. ते किती ताणायचे हे प्रत्येकावर अवलंबून असते. पण आईला सांगावं का? हे प्रकरण किती गंभीर आहे यावर अवलंबून आहे. तुमच्या दोघांच्यात एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद झाला तर तो तुमच्या घरी शेअर करू नका. दुसरीकडे, जर भांडण खूप गंभीर असेल किंवा काहीतरी घडले ज्यामुळे तुम्हाला दुखापत झाली असेल तर त्याबद्दल आईला नक्की सांगा.

mother daughter
लग्नानंतर अनेक वर्षांनी नवरा-बायको विभक्त का होतात? जाणून घ्या कारणे
Relationship Tips
Relationship Tipsesakal

सासुच्या कागाळ्या करू नका

सासू तुमच्याशी रोज कशी बोलतेय, कशी वागतेय, असं सगळं रोजच्या रोज आईला सांगत बसू नका. तिचं छोटसं वागणं खटकलं तरी ते तुमच्यापर्यंत ठेवा. तिच्या चांगल्या गोष्टी आईला सांगा. पण, जर सासू उगाच वाईट बोलत असेल आणि त्याचा तुमच्यावर वाईट परिणाम होत असेल तर ते तुमच्या घरी उघडपणे सांगा. त्यामुळे काही गोष्टी बिघडण्यापूर्वी किंवा त्या गोष्टी गंभीर वळण घेण्यापूर्वी थांबतील.

mother daughter
तुमची मुलगी १८ वर्षांची झालीय का? मोठी होताना तिला काय सांगाल?
family
family

कुटुंबाविषयी गॉसिप

असे कोणतेही कुटुंब नाही जिथे नातेवाईकांमधील इतर लोकांबाबत गॉसिप्स होत नाहीत. पण तुम्ही अशा चर्चेपासून दूर राहिलेले बरे. पण, जर तुम्हाला इतर लोकांचे गॉसिप्स ऐकण्यास भाग पाडले जात असेल, तर तुमचे संभाषण तिथेच संपवा, तुमच्या आईशी बोला आणि तो विषय तिथेच संपवा.

mother daughter
नुकतंच लग्न झालेल्यांनी 'हे' पदार्थ खाताना जरा सांभाळून

काही कौटुंबिक रहस्ये

अनेक कुटुंबांची स्वतःची काही गुपितं असतात. तुम्ही आता सासरच्या कुटुंबाचा एक भाग झाला आहात, त्यामुळे ही रहस्ये आईला सांगू नका. जर ही गोष्ट बाहेर गेली किंवा तिने ती दुसऱ्याला सांगितली तर ते तुमच्यासाठी चांगले होणार नाही. सासरच्या लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडेल,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com