Wedding Shopping : ‘आला आला रूखवत’; असंख्य व्हरायटी अन् होलसेल रेट, पुण्यातल्या या मार्केटला नक्की भेट द्या

स्वस्तात मस्त रूखवतासाठी पुण्यात या मार्केटला भेट द्या
Wedding Shopping
Wedding Shoppingesakal

Wedding Shopping :

कोणत्याही मराठी लग्नात सर्वात आधी चर्चा असती ती मुलीकडच्या बाजूची. कारण, मुलगीच्या दिसण्यावरून ते मुलीने लग्नात काय काय आणलं हे बघायलाच काही पाहुणे खास वेळ काढून येतात. रूखवत बघताना ‘आला आला रूखवत’ यावरून उखाणेही घेतले जातात.

नवरीच्या रूखवताची वेगळीच चर्चा असते. मुलीच्या रूखवतात तिचा संसाराला लागणाऱ्या गोष्टी असतातच पण त्याचबरोबर गृहसजावटीच्या गोष्टीही असतात. मुलीसाठी लहानपणीपासून विणलेली स्वप्नच तो बाप एका दिवसात देत असतो.

Wedding Shopping
Summer Wedding Season: दाट लग्नतिथी अन उन्हाचा कडाका सांभाळा! विविध व्यावसायिकांना आले सुगीचे दिवस

रूखवत शब्दाचा अर्थ काय होतो

हा शब्द फारसी भाषेतून आल्याचे सांगितले जाते. त्यातही मतभेद आहेतच. पण मराठीत रूखवत हा शब्द लेकीला दिली जाणारा निरोप या अर्थाने होतो. लेक सासरला चालली की तिला तिकडे काही कमी पडू नये यासाठी सगळे धडपडत असतात.

लेकीला बस्ता, तिचा पलंग, गादी या सगळ्याच गोष्टी हौसेने देतो. यात शोभेच्या वस्तू, फराळ, पापडांचे विविध प्रकारही असतात. नवा संसार सुरू करताना ज्या-ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्याच लेकीला भेट म्हणून दिल्या जातात.

रूखवताच्या या वस्तू सजावटीच्या असल्या तरी त्या महाग असतात. त्यांची किंमत वाढलेली आहे. तुम्हाला बजेटमध्ये लग्न उरकायचं असेल तर रूखवतावर जास्त खर्च करू नका. त्यासाठी अशी काही होलसेल दुकाने पाहुयात. जिथे हा रूखवत तुम्हाला अगदी कमी किंमतीत मिळेल.

Wedding Shopping
Wedding Season Shopping: लग्नसराईच्या खरेदीने बाजारात लगबग! घागरा-चोलीला विशेष मागणी

रविवार पेठ, पुणे

पुण्यातल्या रविवार पेठेत पारसपणी हे दुकान आहे. जे होलसेल आणि रिटेल दोन्ही प्रकारे माल देतात. इथे तुम्हाला तोरण, फुलांच्या माळा, ब्लाऊज साडी आणि वस्तू सजवण्यासाठीच्या लेस यांच्या अनेक व्हरायटी मिळतील.

बैलगाडी, शहनाई वादक, तुळशीचा कट्टा, दुल्हा-दुल्हन बाहुली, साखरपुडा कोन, सजवलेलं मापटं याच्या अनेक व्हरायटी तुम्हाला मिळतील.

  1. माप – १२०

  2. कळस – १०० ते १२० रूपये

  3. सजवलेले नारळ – १०० रूपये

  4. बैलगाडी – १२०

  5. सजवलेली सप्तपदी सुपारी – १०० रूपयेला ७ नग

  6. मंडोळ्या- १२० ला जोडी

  7. डिझायवर बटवा – ४५ रूपये

  8. ओटीच्या पिशव्या – १०० पासून २५० पर्यंत

  9. मेकअपल पाऊच – १५० रूपये

  10.  डिझाइनर ट्रे, बास्केट, फ्रूट बास्केट – १०० रूपये

  11. फराळाचे बास्केट २५० रूपये डझन

Wedding Shopping
Wedding Season: नववधूंसाठी ३०० ते दीड हजारांपर्यंतच्या ९ हेअरस्टाईल
अशी बैलगाडी तुम्हाला १०० रूपयात मिळेल
अशी बैलगाडी तुम्हाला १०० रूपयात मिळेल esakal

तुळशीबाग  

पुण्यातील खरेदीसाठी प्रसिद्ध असलेली तुळशीबाग नेहमीच गर्दीने भरलेली असते. तुळशीबागेत हुतात्मा बाबु गेनू वाहनतळातील मार्केटमध्ये रूखवताच्या अनेक व्हरायटी पहायला मिळतात. पुण्यात लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी आलेले लोक या मार्केटला हमखास भेट देतात. पुण्यात होलसेल साड्या मिळतात पण रूखवत अन् सजावटीच्या वस्तूही स्वस्तात मस्त मिळतात.

या मार्केटमध्ये सप्तपदी, सजावट, शेवया, पापडांचे सेट, बाहुल्या, आयस्क्रिमच्या काड्यांचे घर, जहाज अशा हजारो वस्तू इथे आहेत.  

  • सप्तपदी सेट – १०० रूपयेला ३

  • शेवयांचा सेट – १५० -२५०

  • डोली – ६० पासून ५०० पर्यंत

  • बैलगाडी १५० पासून १५००० पर्यंत

  • तुळस – ६० ते ६५० पर्यंत

  • औक्षणाचं ताट – १०० पासून

  • मिनी संसारसेट – स्टील पितळ  

Wedding Shopping
Wedding Season: तुलसी विवाहानंतर आता लग्नसोहळ्यांचा धूमधडाका; वधू-वर संशोधन मोहिमेस वेग

रूखवतही झालाय अपडेट

सध्या अनेक लग्नात रूखवतात असंख्य वस्तू पहायला मिळतात. त्यात एक थीम दिसू लागली आहे. ती म्हणजे छोट्या बाहुल्यांपासून मुलीचा जन्मापासूव, शिक्षण, नोकरी आणि लग्नानंतर होणारा गृहप्रवेश यांच्या छोट्या बाहुल्या बनवल्या जातात. त्या एका सेटमध्ये आपल्याला मिळतात. हा सेट लग्नातील रूखवतावर ठेवला की तो ऍटोमेटीक फिरू लागतो. त्यासाठी सेलही असतात. ही एक नवीन गोष्ट पहायला मिळत आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com