Ratnagiri Loksabha: "प्रदुषणावर तोडगा निघेल पण प्रकल्प आणा"; रत्नागिरीतील तरुणांच्या मनात आहे तरी काय?

रत्नागिरी मध्ये रोजगाराचा प्रश्न भीषण आहे.
Ratnagiri
Ratnagiri

नवी दिल्ली : रत्नागिरीत रिफायनरी सारखे प्रकल्प येऊ घातले आहेत. परंतू त्यावरुन मोठ्या प्रमाणावर राजकारण होताना आत्तापर्यंत पहायला मिळालं आहे. स्थानिक लोकांचाही याला विरोध असल्याचं दिसतं.

पण इथल्या तरुणांच्या मनात काहीतरी वेगळचं असल्याचं चित्र समोर आलं आहे. आमचा रोजगाराचा प्रश्न सुटावा यासाठी प्रकल्प आणा प्रदुषणाच्या समस्येवर तोडगा निघेल, अशी भावना सध्या इथल्या तरुणांमध्ये आहे. (Ratnagiri lok sabha youth demanded projects for jobs says pollution problem will be settled)

Ratnagiri
Indian Student Shot Dead in USA: अमेरिकेत भारतीयाची हत्या; एका पोलिसानं गोळ्या झाडल्यानं खळबळ

लोकसभा निवडणुकीनिमित्त सकाळनं रत्नागिरीतून स्थानिकांच्या प्रश्नांचा आढावा घेतला. यामध्ये रोजगाराच्या प्रश्नानं इथं भीषण स्वरुप प्राप्त केल्याचं दिसून आलं आहे. त्याअनुषंगानं काही तरुणांशी आम्ही संवाद साधल्यानंतर त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. (Marathi Tajya Batmya)

Ratnagiri
Navneet Rana: हनुमान चालिसा प्रकरण; राणा दाम्पत्याला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश

"सरकार कोणाचाही येऊ द्या पण आमचे प्रश्न सोडवा? अशी प्रतिक्रिया येथील तरुणांनी दिली आहे. रत्नागिरीत आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, दळणवळणाची पुरेसी साधन नसल्यामुळं इथल्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात रस्त्यांची अवस्था देखील चांगली नसल्यानं इथं व्यापारी देखील फारसे येत नाहीत," अशा तक्रारी इथल्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. (Latest Marathi News)

Ratnagiri
Nasim Khan: नसीम खान यांचा काँग्रेसच्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा; खर्गेंना लिहिलं सविस्तर पत्र

दरम्यान, जर वाहतुकीची व्यवस्था नीट असली तर पुणे-मुंबईवरून जाणारा आंबा थेट रत्नागिरीतून ट्रान्सपोर्ट होऊ शकतो, असं इथले शेतकरी सांगतात. त्याचबरोबर इथला रिक्षाचालकांनी देखील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना अनेक स्थानिक स्वरुपाच्या समस्या मांडल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com