Amaravati Loksabha: अमरावतीत होणार तिरंगी लढत! बच्चू कडूंच्या उमेदवारामुळं महायुती की मविआचा होणार गेम?

अमरावती लोकसभा मतदारसंघ हा विदर्भातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे जिथं भाजपकडून नवनीत राणांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Amaravati Loksabha
Amaravati LoksabhaEsakal

मुंबई : अमरावती लोकसभा मतदारसंघ हा विदर्भातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे जिथं नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखडे असा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी यांच्यात सामना होणार आहे. पण या दोन उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इथं प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंच्या उमेदवाराची एन्ट्री झाली आहे.

दिनेश बूब यांना प्रहार संघटनेचा उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळं अमरावती लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची होऊ शकते. राणांविरुद्ध रिंगणात उतरलेले दिनेश बूब नेमके कोण? हे जाणून घेऊयात. (three way fight will be held in Amaravati loksabha constituency due to the entry of Bachu Kadu)

Amaravati Loksabha
माणुसकीला काळीमा! 80 वर्षीय वृद्ध महिलेवर नात्यातील 22 वर्षीय तरुणाकडून अत्याचार

नवनीत राणा आणि रवी राणा हे अमरावतीतलं हे दाम्पत्य सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या डोळ्यात खुपतं आहे. कारण, ज्या पक्षानं राणांना उमेदवारी दिली, त्याच राणांच्या कार्यकर्त्यांनीच भाजप कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यावरुन नुकतंच बच्चू कडूंनी भाजपवर घणाघाती टीकाही केली होती. (Latest Marathi News)

दुसरीकडे हनुमान चालिसा पठण प्रकरणावरुन याच राणांनी थेट ठाकरेंशी पंगा घेतला होता. अशातच सन २०१९ला नवनीत राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार म्हणून निवडून आल्या. पण आता या राणांना महायुतीतीलच शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आणि अपक्ष आमदार बच्चू कडूंनी उघड उघड विरोध केला आहे. यामुळं कडू यांचे उमेदवार दिनेश बूब चर्चेत आले आहेत.

Amaravati Loksabha
Dilip Ghosh, Supriya Shrinate: कंगनावर केलेली आक्षेपार्ह टीका भोवली! काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत ठरल्या दोषी; निवडणूक आयोगानं दिले 'हे' आदेश

कोण आहेत दिनेश बूब?

दिनेश बूब यांची कट्टर शिवसैनिक अशी ओळख आहे. सर्वांशी जुळून घेऊन काम करण्यात त्यांची हातोटी आहे. प्रहार संघटनेत प्रवेश करण्याआधी ते ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक होते. अमरावती महापालिकेत ते चार वेळा नगरसेवक राहिले आहेत. 2002 ते 2007 या काळात त्यांनी आमरावतीत शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. 2007 ते 2012 श्रीकृष्ण पेठ, अमरावती (शिवसेना), 2012 ते 2017 अंबापेठ, अमरावती (अपक्ष), 2017 पासून जवाहर स्टेडीयम, अमरावती (अपक्ष) म्हणून ते निवडून आले आहेत.

Amaravati Loksabha
China Renames Arunachal Pradesh Areas : चीनची खुमखुमी कायम! 'अरुणाचल'वर दावा करत नावं बदलेल्या ३० ठिकाणांची चौथी यादी केली जाहीर

बूब यांचा राजकीय प्रवास कसा?

सन १९८९ ते १९९३ शिवसेना उपशहर प्रमुख अमरावती

१९९२ ते २००५ भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख अमरावती

१९९९ ते २०११ शिवसेना शहर प्रमुख अमरावती

२०१८ ते २०२२ शिवसेना जिल्हाप्रमुख अमरावती

सद्यपरिस्थितीत शिवसेना सहसंपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होते.

२०१९ पासून लोकसभेसाठी इच्छुक होते.

मुस्लिम आणि इतर धर्मीयांमध्ये त्यांचं चांगलं काम आहे.

सामाजिक कार्यकर्ता म्हणून गोरगरिब आणि आरोग्य क्षेत्रात मोठं काम आहे.

सामाजिक उपक्रमांमध्ये दिनेश बूब यांचं मोठं काम आहे.

Amaravati Loksabha
Income Tax on Congress: "काँग्रेसला 1700 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी जबरदस्ती करणार नाही"; इन्कम टॅक्स विभागाचं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण

अमरावतीत कशी आहेत राजकीय गणित?

अमरावती लोकसभा मतदारसंघाबाबत सांगायचं झाल्यास, महायुतीत ही जागा भाजपकडे, महाविकासआघाडीत ही जागा काँग्रेसकडे गेली आहे. पण, हा मतदारसंघ परंपरागत शिवसेनेचा मतदारसंघ आहे. त्यामुळे यंदा ही जागा शिवसेनेला मिळावी अशी शिंदे आणि ठाकरे दोन्ही बाजूंच्या शिवसैनिकांची इच्छा होती.

परंतु, महायुती आणि महाविकासआघाडी दोन्हीकडून शिवसेनेच्या हातून ही जागा गेली आहे. त्यामुळे ठाकरेंशी एकनिष्ठ आणि निष्ठावंत राहिलेल्या दिनेश बूब यांना उमेदवारी देण्याचा निर्णय प्रहार संघटनेनं घेतला आहे. त्यासाठी दिनेश बूब यांनीही शिवसेनेची साथ सोडून प्रहार संघटनेत प्रवेश केला आणि आता ते प्रहार संघटनेकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.

Amaravati Loksabha
Katchatheevu Island Row: भाजपनं उकरुन काढलेल्या कच्चाथिऊ प्रकरणावर डीएमकेचं प्रत्युत्तर; इलेक्टोरल बॉण्ड...

दिनेश बूब यांच्या एका उमेदवारीचा महायुती आणि महाविकासआघाडी दोन्हींवर परिणाम होणार, असं प्राथमिक चित्र आहे. कारण, अमरावतीतील दोन मतदारसघ मेळघाट आणि अचलपूर जिथून प्रहारचे अनुक्रमे राजकुमार पटेल आणि बच्चू कडू आमदार आहेत. तिथे दिनेश बूब यांना बच्चू कडूंची मदत होईल, असं दिसतंय.

पण, संपूर्ण लोकसभा मतदारसंघात ते कितपत भारी पडतील, हे आता सांगणं तरी कठीण आहे. कारण आता तरी त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पण भाजप उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस इथे शिष्टाई करणार का? आणि दिनेश बूब यांची उमेदवारी मागे घेऊन त्यांच्या शिष्टाईला फळ येणार का? हे चित्र येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com