
तिरुपतीला येणाऱ्या भाविकांच्या गाड्या अडवून त्यात असणाऱ्या वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती काढायला सांगितल्या जात आहेत. देवदेवतांचे फोटो देखील झाकले जात आहेत. मागच्याच आठवड्यात महाराष्ट्रातल्या एका भाविकाला गाडीत स्थापित असणारी शिवाजी महाराजांची मूर्ती काढायला सांगितली असता, त्या भाविकाने देवस्थानच्या जाचाला वाचा फोडली आणि या प्रश्नावर महाराष्ट्रात वादंग माजले !
- रणजित यादव
रणजित यादव -
आंध्र प्रदेशातल्या चित्तूर जिल्ह्यातील तिरुपती येथील वेंकटेश्वर मंदिर अर्थात बालाजी ते भारतातल्या अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी भारत आणि जगभरातून करोड भाविक तिरुपतीला दर्शनासाठी जातात. ईश्वर कोणत्याही रूपातील असला किंवा अवतारातील असला तरी ईश्वर एकच आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ईश्वराची प्रतिमा प्रत्येकासाठी वेगवेगळी असली तरी, श्रद्धा हीच श्रेष्ठ आहे. पण मागच्या काही वर्षापासून तिरुपती देवस्थान ने मात्र एक नवीनच प्रकार चालु केलाय. (a controversy over the removal of Chhatrapati Shivaji's idol from a vehicle belonging to Maharashtrian devotees.)
तिरुपतीला येणाऱ्या भाविकांच्या गाड्या अडवून त्यात असणाऱ्या वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती काढायला सांगितल्या जात आहेत. देवदेवतांचे फोटो देखील झाकले जात आहेत. मागच्याच आठवड्यात महाराष्ट्रातल्या एका भाविकाला गाडीत स्थापित असणारी शिवाजी महाराजांची मूर्ती काढायला सांगितली असता, त्या भाविकाने देवस्थानच्या जाचाला वाचा फोडली आणि या प्रश्नावर महाराष्ट्रात वादंग माजले !
औरंगजेब, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही अशा अनेक पादशाह्यांच्या जाचात हा आदेश भरडत चाललेला असताना, या महाराष्ट्राच्या मातीत स्वातंत्र्याचा पहिला अंकूर फुटला! या संपूर्ण भरत भूमीला मुक्त करण्यासाठी घोड्यांचा पहिला टप्पा पडल्या, त्या मावळ्याच्या मुलखात!
महंमद गझनीच्या आक्रमणापासून आजपर्यंत मागच्या एक हजार वर्षातील सगळ्यात क्रांतीकारक घटना कोणती असेल? तर ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म! या एका गोष्टीने अनेक पातशाह्या गडगडल्या, इतल्या मातीतल्या माणसाने मोकळा श्वास घेतला. त्यांच्या जन्मामुळेच अंगणातली तुळस आणि मंदिरावरील कळस शिल्लक आहेत. आज याच मंदिरांना महाराजांच्या मूर्तीचा वावडे होते याला काय म्हणावं? हे त्याच ठिकाणी घडतय,जिथं आजपासून बरोबर 345 वर्षापूर्वी दहा हजार मराठ्यांची छावणी पडली होती.
भगवान विष्णूच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, आमच्या महाराजांच्या पदस्पर्शाने रोमांचित झाली होती. बहमनी राज्य त्यानंतर आदिलशहा, कुतूबशहा यांच्या वरवंट्याखाली असणाऱ्या या भूमीने अनेक वर्षानंतर मुक्तीचा अनुभव घेतला होता, पण आज काय घडतयं?
छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वतःच आपली विजयी सेना घेऊन तिरुपतीला पोचले. तेव्हा काय झालं? नोव्हेंबर 1676 मध्ये संपूर्ण दक्षिण भारताला पातशाही जाचातून मुक्त करण्याचा, मराठ्यांच्या झेंड्याखाली आणण्याचं स्वप्न उराशी घेऊन महाराज हैदराबाद, गोवळकोंड्याच्या दिशेने निघाले. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने महाराजांचा स्वागत केले. त्यांना आपल्या सिंहासनावर बसण्यासाठी जागा दिली. एक प्रकारे कुतुबशहाने महाराजांचा मांडलिकत्व स्वीकारलं. त्यानंतर महाराज श्रीशैलमला पोहचले.
श्रीशैलम ला महाराजांचा मुक्काम नऊ दिवसांसाठी होता. मल्लिकार्जुना चे दर्शन घेऊन महाराज तेथुन आलमपूरला पोहोचले. करनुल, नांदियाळ,कडप्पा मार्गे 4 मे 1677 रोजी महाराज तिरुपती येथे व्यंकटेश्वरा च्या दर्शनासाठी आले. बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर तिरुपती देवस्थानसाठी महाराजांनी पुरुषोत्तम भट, सोमय्या भट बुर्डी यांना एक सनद दिली. ती सनद उपलब्ध आहे.
या सनदेनुसार एक होनाचे ब्राह्मणास अन्नदान, श्री पूजेसाठी वार्षिक तीस होन, कर्पूर दिपा साठी वार्षिक सहा होन, श्रीनिवास मूर्तीसाठी शिराबधी अभिषेकार्थ बारा होन, नंदादीपा साठी बारा होन, पूजा निमित्त श्री पुरुषोत्तम बुर्डीना वार्षिक तीस होन वर्षासन, रोज च्या अन्नछत्रा साठीतीनशे साठ होन, असे चारशे वीस होन असे प्रति वर्षी श्रीच्या मूर्तीसाठी देण्याचे महाराजांनी ठरवले.
विशेष म्हणजे पुढच्या एक वर्षासाठी श्रींची पूजा अर्चा, त्याचबरोबर अन्नछत्र साठी लागणारे चारशे वीस होन महाराजांनी तत्काळ बुर्डीच्या स्वाधीन केले. तिरुपतीहून निघाल्यानंतर महाराज कालहस्ती मार्गे मंदिराच्या जवळ पाच मैला वरील पेंदापोलम येथे 9 मे 1677 रोजी येऊन पोहोचले. श्रीशैलम्म, तिरुपती, कालहस्ती ही सर्व देवस्थाने तेव्हा कुतुबशाह याच्या अखत्यारित येत होती.
महाराजांनी कुतुबशाह कडून या देवस्थानांना कोणत्याही प्रकारचा उपसर्ग होणार नाही, याची हमी घेतली होती. महाराजांनी सनदापत्र तर दिली, पण या सनदांच पुढे काय झालं? कारण महाराष्ट्रावर पुढे 26 वर्षे औरंगजेबाचा संकट आलं. छत्रपती संभाजी राजांची औरंगजेबाने तुळापुर हत्या केली! पण तरीसुद्धा शिवाजी महाराजांनी तिरुपती देवस्थान यांना दिलेल्या सनदानुसार संपूर्ण वर्षासन नेहमी चालू ठेवली गेली.
त्या सदनांचा अंमल काही काळासाठी विस्कळित झाला. तेव्हा पुरुषोत्तम बुर्डी यांचा वंशज राजाराम महाराजांना तामिळनाडूतील जिंजी येथे जाऊन भेटला. तेव्हा राजाराम महाराजांनी 18 मे 1694 रोजी मौजे कुवानुर, तालुका अक्कलमंगळ, पोलूर परगणा त्यासाठी वर्षासन म्हणून दान दिल्याची सनद दिली. 21 एप्रिल 1632 ला संभाजीराजांचे पुत्र, शाहू महाराज यांनी यावर वर्षासनाचे नूतनीकरण केल्याची सनद देखील उपलब्ध आहे.
शाहू महाराज आणि मराठ्यांचे दक्षिणेतील कारभारी मोरारजी घोरपडे यांना श्रींचा अभिषेक व पूजा अर्चा थोरल्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कायमचा चालवण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. त्या पुढच्या काही वर्षांसाठी चालू देखील होते. शिवाजी महाराजांनी दिलेला शब्द मराठ्यांनी अशाप्रकारे पाळून दाखवला.
तिरुपती देवस्थान चा आणि आमच्या महाराजांचा असा प्रत्यक्ष संबंध असताना देखील, कुतुबशाही आणि आदिलशाहीचा तावडीतून तिरुपतीची कायमची सुटका करून देखील,तिरुपती देवस्थान हे महाराजांच्या आणि मराठ्यांच्या स्वराज्याचं एक लाभार्थी संस्था असतानादेखील, आज महाराजांचा फोटो आणि मूर्तीला देवस्थान समिती विरोध करत असेल, तर तो फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे, तर देशासाठी अपमान जनक प्रसंग आहे! या संस्थांची ही मुजोरी मोडून काढणे गरजेचे आहे. कारण ज्या व्यक्तीमुळे देवळातला देव टिकला त्या व्यक्तीचा या भारत भूमीवर पहिला अधिकार आहे !
- रणजित यादव (लेखक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.