नवनीत राणा यांच्यामुळे चर्चेत आलेली MRI चाचणी नेमकी काय?

तुम्हाला माहिती आहे का की MRI चाचणी म्हणजे काय?
MRI Test
MRI Testsakal

सध्या राज्यात नवनीत राणा (Navneet Rana) प्रकरण चांगलेच तापले आहेत. खासदार नवनीत राणा यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तुरुंगात असताना त्यांना मानेच्या, पाठीच्या दुखण्याचा त्रास सुरु झाला होता. या दरम्यान जामीनानंतर त्यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि त्यांची एमआरआय चाचणी (MRI Test) करण्यात आली होती. याच एमआरआय चाचणीवरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. पण तुम्हाला माहिती आहे का की MRI चाचणी म्हणजे काय? MRI तपासणी कशी करतात? आज याबाबतच आपण जाणून घेणार आहोत. (as mp navneet rana underwent an MRI scan do you know about this MRI test)

MRI Test
''दादा तुम्ही सर्वात जास्त काम करता'', नवनीत राणांची अजित पवारांना साद

MRI चाचणी म्हणजे काय?

MRI चाचणी म्हणजे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (Magnetic Resonance Imaging) MRI चाचणीचा उपयोग विविध आजारांच्या निदानासाठी केला जातो. MRI चाचणी वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची बाब असून यामुळे अनेक आजारांचे निदान केले जातात. एमआरआय असे यंत्र आहे जे मानवी शरीरातील अंतर्गत अवयवांचे स्कॅनिंग होत आपल्याला कोणता रोग आहे, हे शोधून काढले जाते.

MRI Test
Navneet Rana Case : गैरवर्तनाचे सत्र रात्रभर चालू होते का? राम कदमांचा सवाल

एमआरआय स्कॅन का केले जाते?

एमआरआय स्कॅनद्वारे, हृदसंपूर्ण शरीराची तपासणी केली जाते यामुळे डॉक्टरांना रोग ओळखण्यास आणि त्यांच्यावर उपचार करण्यास मदत होते. MRI scanning साठी साधारण 30 ते 60 मिनीटे लागतात. या एमआरआय चाचणीद्वारे सॉफ्ट टिश्युजच्या जसे स्नायूच्या समस्या मेंदु व इतर शरीरातील अवयवातील समस्या समोर येतात.

MRI Test
अमेरिकेतील १०० वर्षीय नागरिकांनी उलगडले दीर्घायुष्याचे रहस्य

MRI चाचणीसाठी येणारा खर्च

MRI चाचणीचा खर्च प्रत्येर राज्यात वेगवेगळा आहे.शरीरातील कोणत्या भागाची तपासणी करायची आहे त्यानुसार cost अवलंबून असतात. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर सारख्या ठिकाणी MRI scanning साठी साधारणत: 3000 ते 15000 पर्यंत खर्च येऊ शकतो.

MRI Test
या तीन गोष्टी करा आणि कर्करोग टाळा

MRI तपासणी कशी केली जाते?

MRI चाचणीसाठी एका विशिष्ट रूममध्ये नेले जातात. त्यानंतर स्कॅनिंगसाठी टेबलवर झोपवले जाते. त्यानंतर स्कॅनर टेबल हा रुग्णाला घेऊन आतमध्ये सरकतो व MRI स्कॅनिंग तपासणी सुरू केली जाते. तपासणीनंतर radiologist कम्प्युटरवर शरीरातील images ची तपासणी जाते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com