
Devendra Fadnavis Astrology : यंदा होळीत 'या' रंगामुळे वाढणार फडणवीसांचा राजकीय प्रभाव, वाचा ज्योतिषी काय म्हणाले...
Devendra Fadnavis Astrology : सध्या राज्यात भाजप आणि शिंदे गटाच्या युतीची सत्ता आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत हातमिळवणी करुन भाजपने पुन्हा महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात फडणवीसांचे वर्चस्व दिसून येत आहे.
फडणविसांकडे जरी उपमुख्यमंत्री पद असले तरी त्यांची राजकीय बाजू मजबूत आहे. होळीनिमित्त आम्ही देवेंद्र फडणवीस यांची यंदाची होळी कशी जाणार आणि त्यांची ग्रहस्थिती कशी आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. ज्योतिषांनी याविषयी माहिती दिली आहे. (Bjp Leader Devendra Fadnavis Astrology Holi Festival read what astrologist Said)
ज्योतिषांच्या मते, देवेंद्र फडणवीस यांचे सध्या ग्रहयोग मजबूत आहेत त्यामुळे त्यांची राजकीय स्थिती मजबूत दिसतेय. फडणवीसांच्या स्वराशीतील शनी आणि स्वराशीतील गुरु यांच्यामुळे त्यांचे प्रभुत्व राजकारणात वाढलेले दिसतेय.
यंदाची होळी त्यांच्या साठी शुभमंगल असणार आहे. होळीसाठी त्यांचा शुभ रंग पिवळा आहे. त्यामुळे यंदाची होळी त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या प्रभावशाली दिसून येणार.
एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी म्हणजेच युती केल्यानंतर त्यांनी गमावलेली सत्ता पुन्हा परत आणली. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजप वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी झालंय.
एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलंय त्यामुळे हा एक प्रकारचा शिंदेसोबत भाजपचाही विजय झालाय याचाच प्रभाव येत्या दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात दिसून येणार आहे.
- डॉ नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक