..यामुळे मलिकांचा राजीनामा घेत नाहीत, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जात नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
Chandrakant Patil
Chandrakant Patilesakal

दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजप आक्रमक झाल्याचे दिसत आहे. यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी होत आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी ठाम भूमिका महाविकास आघाडीनी घेतली आहे. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्यामागे धक्कादायक विधान केले. (Chandrakant Patil tweet on Nawab Maliks Resignation)

Chandrakant Patil
"महाविकास आघाडीला आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी"

एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जात नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. "राज्यातील एक मंत्री इतके दिवस तुरुंगात राहूनसुध्दा त्याचा राजीनामा न घेणं ही लोकशाहीची क्रुक थट्टा आहे. आमच्या पक्षावर जातीचे राजकारण करत असल्याचा आरोप करणारे आज एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही.” असे पाटील म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com