मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडून पोलिसांवर कौतुकांचा वर्षाव

mumbai police
mumbai policeesakal

मुंबई - मुंबई पोलिसांचं (mumbai police) कौतुक करावं तितके कमीआहे. मला अभिमान आहे पोलिसांचा. या क्षेत्रात महिला देखील कुठेही कमी नाहीत. असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांनी मुंबई पोलीसांचे कौतुक केले. प्रजासत्ताक दिनाच्या (republic day) पूर्वसंध्येला राष्ट्रीय पोलिस पदकांची काल घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ५१ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला. राज्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदके’, सात जणांना ‘पोलिस शौर्य पदके’ आणि प्रशंसनीय सेवेकरिता ४० ‘पोलिस पदके’ (Police Medal) जाहीर झाली आहेत. (Police Medal Announced) या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री गृहमंत्र्यांकडून पोलीसांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.

पोलीस पथकाची राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना

भारतीय प्रजासत्ताक दिन (republic day of india) आज देशभरात उत्साहाने साजरा होत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हेसुद्धा उपस्थित होते. याशिवाय राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

सरकार काही कमी पडू देणार नाही- मुख्यमंत्री

एखादी घटना घडते. तेवढ्यापूर्वी चर्चा होते मग सर्व शांत होते अशा घटना घडू नये यासाठी ही योजना चांगली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिलेली मदत ही अशाच कामांना वापरू. सरकार आपल्याला काही कमी पडू देणार नाही. पोलिस दलाचं काम खूप किचकट आहे. एसी हाॅलमध्ये बसून एका ओळीत मांडण ते शक्य नाही.

mumbai police
राजपथावर अवतरली महाराष्ट्रातील जैवविविधता!चित्ररथाची खास झलक

निर्भया पथकाच्या स्थापनेनंतर गुन्हे नोंदणीचं प्रमाण वाढले - गृहमंत्री वळसे पाटील

दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडूनही पोलीसांचे कौतुक करण्यात आले. ते म्हणाले, पोलिस दलाचा कुटुंब प्रमुख म्हणून मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. अशीच काम त्याचाकडून अपेक्षित आहेत. याचा फायदा नक्कीच महिलांना होईल अशी अपेक्षा आहे. या सर्व गोष्टी करतअसताना महिला सक्षमीकरणासाठी बळकट पाऊल पुढे टाकलं आहे. पोलिसांच्या तपासाचे कौशल्य इतर देशाच्या तपास यंत्रणेच्या तोडीस आहे. निर्भया पथकाच्या स्थापनेनंतर गुन्हे नोंदणीचं प्रमाण वाढले आहे. मात्र अशा प्रकरणात पोलिस फास्टट्रॅक पद्धतीने हाताळले जात आहेत. ही जरी जमेची बाजू असली तरी महिलांवरील वाढते गुन्हे हे चिंताजनक आहेत

mumbai police
Republic Day 2022: महाराष्ट्राच्या चित्ररथाची कविता सुदेश भोसलेंच्या आवाजात

गृह मंत्रालयाच्या वतीने यंदा देशभरातील एकूण ९१९ ‘पोलीस पदके’ जाहीर झाली असून ८८ पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदके' (पीपीएम), १८९ जणांना ‘पोलिस शौर्य पदके’(पीएमजी) आणि ६६२ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलिस पदके’ (पीएम), तर दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदके’ जाहीर झाली आहेत. यातील राज्याचा वाटा ५१ पदकांचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com