esakal | सत्तार यांचा दोन वर्षांतील कट्टर काँग्रेस समर्थक ते शिवबंधनापर्यंतचा प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सत्तार यांना उमेदवारी हवी होती. मात्र, काँग्रेसने विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून सत्तार नाराज होते. त्यांनी काँग्रेसविरुद्ध बंड पुकारल्यामुळे त्यांची पक्षाने हकालपट्टीही केली होती. सत्तार गेली तीन दशके औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणात आहेत.

सत्तार यांचा दोन वर्षांतील कट्टर काँग्रेस समर्थक ते शिवबंधनापर्यंतचा प्रवास

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचा गेल्या दोन वर्षातील प्रवास गंमतीशीर आहे. शिवसेनेला विरोध करता करता सत्तार थेट शिवसेनेतच दाखल झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा प्रयत्न केला होता. मात्र, अखेर त्यांनी शिवबंधन बांधले.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सत्तार यांना उमेदवारी हवी होती. मात्र, काँग्रेसने विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून सत्तार नाराज होते. त्यांनी काँग्रेसविरुद्ध बंड पुकारल्यामुळे त्यांची पक्षाने हकालपट्टीही केली होती. सत्तार गेली तीन दशके औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणात आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीपासून त्यांनी राजकारणाची सुरूवात केली आहे. सिल्लोडचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. काँग्रेसमध्ये 1999 पासून त्यांची कारकीर्द आहे.अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांच्या भाषणात अडथळा आणल्याबद्दल मार्च 2017 मध्ये विधानसभेतून निलंबित केलेल्या 18 आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता. 

- सत्तार यांच्या अटकेसाठी शिवसेनेचे रास्तारोको
- अब्दुल सत्तार यांचे बंडाचे निशाण
- अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
सत्तार-विनोद पाटील भेटीने चर्चेला उधाण
लोकसभा निवडणुकीतून सत्तार यांची माघार
- सत्तार यांचे वजन हर्षवर्धन पाटलांच्या पारड्यात
- दानवेंच्या समर्थनार्थ बैठक, सत्तार-जाधव यांच्यासह 81 सदस्य उपस्थित
- सत्तार यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या चर्चा

loading image
go to top