Corona Update : राज्यात 6,005 नवे रुग्ण, 177 रुग्णांचे मृत्यू

राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ
corona virus update
corona virus updateesakal

मुंबई : राज्यात आज दिवसभरात 6,005 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या 63,21,068 झाली आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी वाढून 74,318 इतकी झाली.

corona virus update
अमेरिकेत पुन्हा गोळीबार; लॉकडाउन केलेला पेंटॅगॉनचा परिसर पूर्वपदावर

राज्यात आज 177 कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. अकोला मंडळात एकही मृत्यू झाला नाही. पुणे मंडळात आज सर्वाधिक मृत्यू झाले असून तिथे आज अनुक्रमे 78 मृत्यूची नोंद झाली. ठाणे 21, नाशिक 20, कोल्हापूर 37, औरंगाबाद 15, लातूर 5 मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के इतका आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,33,215 वर पोहोचला आहे.

corona virus update
भारतासह पाच देशांच्या नागरिकांना UAEत परतण्यास परवानगी

आज दिवसभरात 6,799 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 61,10,124 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  96.66 टक्के एवढे झाले आहे.

corona virus update
धक्कादायक! अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आढळला तरूणीचा मृतदेह

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,85,32,523 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,21,068 (13.02 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,51,971 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 3,009 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com