राज्यात दोन वर्षात पहिल्यांदाच कोरोना आकडेवारी शंभराच्या खाली |Coronavirus Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

राज्यात दोन वर्षांत पहिल्यांदाच कोरोना आकडेवारी शंभराच्या खाली

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या नव्या वर्षाच्या सुरुवातीला वेगाने वाढत होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच करोना रुग्णवाढीला 'ब्रेक' लागला. फेब्रुवारीत तर, कोरोनाची तिसरी लाट जवळजवळ पुर्णपणे ओसरली त्याचदरम्यान शनिवारला कोरोना रुग्णांची दैनंदिन आकडेवारी गेल्या जवळपास दोन वर्षांत पहिल्यांदाच शंभराच्या खाली आली आहे.

आपण कोरोना लाटेच्या शेवटच्या ट्प्प्यात आहोत आणि रविवारची ही सर्वात कमी दैनंदिन आकडेवारी असल्याचे राज्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी मुंबईत २९ कोरोना रुग्णांच्या आकडेवारीसह सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली. मुंबईत मार्चमध्ये २ रुग्णांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर राज्यात साताऱ्यात एका रुग्णाच्या मृत्युनंतर कुठलीही मृत्यु आकडा समोर आला नाही. सध्या महाराष्ट्रात कोरोना कमी झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. ही राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे.

हेही वाचा: हिजाब बंदीचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी; दोघांना अटक

बीएमसीने (बृहन्मुंबई महानगरपालिका) त्यांच्य सर्व केंद्रावर १२ ते १४ वर्ष वयोगटाकरीता लसिकरण सुरु केले आहे. बीएमसीने मागील आठवड्यात लसीकरणाकरीता १० केंद्र सुरु केले होते. आम्ही १०० लसीकरण केंद्र सुरु करणार असल्याचे बीएमसीचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले.

Web Title: First Time Since Last Two Years There Is Less Than 100 Covid Cases In Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top