

Mumbai Rain Red Alert
ESakal
मुंबई : मुंबईकरांनो पुढील दोन दिवस सावधान! मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात पुढील ४८ तास पावसाचे तांडव पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) ४ आणि ५ जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. या कालावधीत अनेक ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार (अतिवृष्टी) पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.