सरपंच आता थेट लोकांमधून निवडणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

राज्य मंत्रीमंडळाची आज झालेल्या बैठकीत ग्रामपंचायतींबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या सर्वांत मोठा निर्णय हा सरपंचपद निवडीचा असून, आता ग्रामपंचायतींचाही अर्थसंकल्प बनविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई - राज्यात सप्टेंबर महिन्यात सुमारे 7 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून, आता सरपंच थेट लोकांमधून निवडण्यात येणार असल्याचा निर्णय आज (सोमवार) झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्य मंत्रीमंडळाची आज झालेल्या बैठकीत ग्रामपंचायतींबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या सर्वांत मोठा निर्णय हा सरपंचपद निवडीचा असून, आता ग्रामपंचायतींचाही अर्थसंकल्प बनविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्य मंत्रीमंडळाचे निर्णय :

  • ग्रामसभेचा अध्यक्ष आणि ग्रामपंचायत समितीचे अध्यक्ष यापुढे सरपंच असणार 
  • अर्थसंकल्प तयार करून मंजूर करण्याचे अधिकार सरपंचांकडे
  • 1995 नंतर जन्म झालेल्यांना सरपंचपदाची निवडणूक लढवताना 7 वी पासची अट 
  • 1995 च्या आधी जन्मलेल्यांना शैक्षणिक अट नाही
  • सरपंचांच्या अधिकारांमध्ये वाढ
  • ग्रामसभेचा अध्यक्ष आणि ग्रामपंचायत समितीचे अध्यक्ष यापुढे सरपंच असणाऱ
  • गुजरात, मध्य प्रदेशमध्ये असा निर्णय झाला असून, याचा अभ्यास-दौरा करून माहिती राज्य सरकारने घेतली

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
पेट्रोलपंप चालकांचा 12 जुलैला देशव्यापी संप
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​
चांगला कर साधासरळ ठरावा!​
#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​
भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​
प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​
चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​
विवाहातील बचतीतून वऱहाडींना वाटली 2 हजार रोपे​
नाशिक भागात पावसाची उघडीप : शेतीकामांना वेग​ 

Web Title: Maharashtra news sarpanch will now choose directly from the people