मॉन्सून महाराष्ट्रात दाखल; दक्षिण कोकणात दमदार हजेरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

सध्या मॉन्सूनला अरबी समुद्र, कर्नाटक, गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. तसेच कर्नाटक, रायलसीमा, आंध्रप्रदेश या भागातही व्यापण्यासाठी पोषक स्थिती आहे.

पुणे - कर्नाटकात दाखल झालेला मॉन्सून वेगाने महाराष्ट्राकडे सरकत आहे. गुरूवारी (ता.८) मॉन्सूनने गोवा आणि दक्षिण कोकणातील वेगुर्लापर्यत मजल मारली. मुंबई आणि कोकणाचा उत्तर भाग, मध्य महाराष्ट्रात शनिवारी (उद्या) किंवा रविवारी दाखल होईल. परिणामी गोवा, कोकणाचा दक्षिण भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी व्यक्त केला. 

सध्या मॉन्सूनला अरबी समुद्र, कर्नाटक, गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. तसेच कर्नाटक, रायलसीमा, आंध्रप्रदेश या भागातही व्यापण्यासाठी पोषक स्थिती आहे. तसेच बंगालचा उपसागर, त्रिपूरा, आसाम, मेघालय, हिमालय, पश्चिम बंगाल या भागात अनुकूल स्थिती तयार होत आहे. अरबी समुद्रात तयार झालेले चक्राकार वारे ओमानकडे सरकल्यामुळे रेंगाळलेला मॉन्सून सक्रिय झाल. त्यामुळे गुरूवारपर्यत थेट दक्षिण कोकणापर्यत मॉन्सून दाखल झाला अाहे. 

उत्तर भारतातील पंजाब ते उडिसाचा उत्तर भाग, राजस्थानचा उत्तर भाग ते बंगाल चा उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र मध्यप्रदेशचा उत्तर भाग, छत्तीसगड आणि उडिसा या भाग व्यापण्याची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मिर या भागातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली असून ती समुद्रसपाटीपासून ३.१ आणि ३.६ किलोमीटर उंचीवर आहे. पाकिस्तानच्या मध्यभागातही चक्राकार वाऱ्याचे क्षेत्र तयार झाले असून ते राजस्थानच्या पश्चिम भागापर्यत आहे. समुद्रसपाटीपासून ते २.१ किलोमीटर उंचीवर आहे. बंगाल उपसागराचा पूर्व भाग, आणि अंदमान समुद्राचा उत्तर भागात समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. आंध्रप्रदेश आणि बंगाल उपसागर, उडिसाचा दक्षिण भागातही चकाक्रार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. बिहारचा आग्नेय भाग व परिसरात चकाक्रार वाऱ्याचे स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तसेच छत्तीसगडच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून ती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. 

देशातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या ४८ तासामध्ये हिमाचलप्रदेश, उत्तराखंड, बिहार, कोकण, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, अंदमान व निकोबार परिसरात जोरदार पाऊस झाला. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगाना, कर्नाटकाचा दक्षिण भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. मध्य प्रदेशचा पश्चिम भाग, छत्तीसगड, हिमालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, नागालॅण्ड, मनीपूर, मिझोराम, त्रिपूरा, तमिळनाडू, जम्मू आणि काश्मिर, पंजाब, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा पूर्व भाग, विदर्भ, गुजरात, उडिसा, आसाम, मेघालय, कर्नाटक लक्षद्वीप या भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे कमाल तामपानात किंचित घट झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये बेऱ्हामपोर येथे ४३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची उच्चांकी नोंद झाली. 
येत्या दोन ते तीन दिवसात जम्मू आणि काश्मिर, हरियाना, मध्य प्रदेसचा पश्चिम भाग, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, त्रिपूरा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगाना, केरळ, तमिळनाडू, अंदमान व निकोबार परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
सरकार शेतकऱ्यांना फक्त गोळ्या घालते: राहुल गांधी
मेहरून्निसा दलवाई यांचे निधन
औरंगाबादेत भाजपचे कर्जमुक्तिचे बॅनर फाडले
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्याचा मृतदेहाचे शवविच्छेदन
मुख्यमंत्री येईपर्यंत जाळू नका; शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून केली आत्महत्या
तिडके, डोईफोडेचे अपराध अन् निशब्द पंकजा
म्यानमारच्या विमानाचे अंदमानमध्ये सापडले अवशेष; सर्व प्रवाशांचा मृत्यू
मंदसोरच्या जिल्हाधिकारी, एसपींची बदली; राहुल गांधी शेतकऱ्यांच्या भेटीला
धुळे: कर्जमाफीसाठी शिवसेनेचे 'जलसमाधी' आंदोलन
पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय​
#स्पर्धापरीक्षा - बुद्धिबळ : कार्लसनची जगज्जेतेपदाची हॅट्ट्रीक​
शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेले सरकार आंदोलनावरून काँग्रेस, माकपचे टीकास्त्र​
जनावरे खरेदी-विक्री निर्बंधास सर्वोच्च न्यायालयात आव्हान
 

Web Title: monsoon arrive in Maharashtra