खाते वाटपाचा तिढा सुटणार? मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक

टीम-ई-सकाळ
Monday, 2 December 2019

खाते वातपातील तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री एकनाथ शिंदे आदी नेते उपस्थित आहेत.

मुंबई : खाते वातपातील तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री एकनाथ शिंदे आदी नेते उपस्थित आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

२८ नोव्हेंबर रोजी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जेष्ठ नेते छगन भुजबळ आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली. त्यानंतर केवळ या सहा मंत्र्यांनीच शपथ घेतल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार करणे बाकी असून तो १२ डिसेंबर पर्यंत करण्यात येण्याची शक्यता आहे. 

पंकजा यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण 

मुख्यमंत्र्यांच्या दालनात सुरु असलेल्या या बैठकीत आता काय निर्णय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. उपमुख्यमंत्रीपदासोबतच अन्य महत्वाच्या खात्यावर चर्चा होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे; पाहा कोण कोठे राहणार

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयातल्या परंपरा, प्रथा मला ठाऊक नाहीत तरीही हे शिवधनुष्य उचललं आहे असंही उद्धव ठाकरेनी म्हटलं होतं. कराच्या रुपाने येणारा पैसा आपण कसा खर्च करतो? याचं उत्तर जनतेला द्यायचं आहे असेही त्यांनी म्हटले होते. मोठी आव्हानं पाहून मी पळून गेलेलो नाही. हे आव्हान स्वीकारलं असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP and Shiv Sena leaders Meeting in Chief Ministers Hall