Praful Patel: राज्यसभेची टर्म सुरू असतानाच प्रफुल्ल पटेलांनी का दिला राजीनामा? पार्थ पवारांशी 'असं' आहे कनेक्शन!

राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेलांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा अर्ज भरला आहे.
Prafull Patel resignation connection with Parth Pawar
Prafull Patel resignation connection with Parth Pawar

Praful Patel Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेलांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा अर्ज भरला आहे. पण अद्याप टर्म संपलेली नसतानाच त्यांनी राजीनामा देत पुन्हा नव्या जागेसाठी अर्ज दाखल केला आहे. पटेल यांनी असा निर्णय का घेतला? यावर त्यांनी माध्यमांशी बोलताना नुकतंच भाष्य केलं. पण काही गोष्टी गुलदस्त्यात राहू द्या असंही सांगितलं, त्यामुळं यामागं नेमकी काय कारणं असू शकतील याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. (ncp leader praful patel resign when his rajya sabha term in not over connection with partha pawar and sunetra pawar)

Prafull Patel resignation connection with Parth Pawar
Farooq Abdullah: इंडिया आघाडीला आणखी एक झटका! आता फारुख अब्दुल्लांचाही 'एकला चलो'चा नारा

अनेकजण राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक

राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेल यांनी आज विधान भवनात जाऊन अर्ज भरला. यानंतर बाहेर आल्यानतंर माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं, "आमच्याकडं अनेक लोकं येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळात मी फॉर्म का भरला हे तुम्हाला कळेलच. आमची महायुती एकदम घट्ट आहे. देशात पुन्हा NDAची सत्ता येणार असून खासदार ४०० पार जातील. महाराष्ट्रात अनेक सर्व्हे येत आहेत, आमच्या ४५ जागा नक्की येतील याची आम्हाला खात्री आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा वाटा राहिल. (Latest Marathi News)

Prafull Patel resignation connection with Parth Pawar
Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर घेतलं पाणी

पार्थ पवार अन् सुनेत्रा पवारांचं कनेक्शन

दरम्यान, पटेलांनी माध्यमांशी बोलताना आपण पुन्हा अर्ज का भरला? हे स्पष्टपणे सांगितलेलं नसलं तरी याचं नेमकं कारण काय असू शकेल किंवा संभाव्य राजकीय गणितं काय असतील? याबाबत आम्ही राजकीय विश्लेषकांकडून धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक बाब अशी की, अपात्रतेची कारवाई प्रलंबित असल्यानं प्रफुल्ल पटेल यांनी हा सावध निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. तर इतर काही बाबींची यामध्ये लिंक असल्याचंही समोर येत आहे.

या घडामोडीचं विश्लेषण करताना वरिष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी सांगितलं की, "बारामतीमधून लोकसभेसाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्याचबरोबर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनाही दिल्लीत पाठवण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळं सहाजिकचं आत्ता प्रफुल्ल पटेलांऐवजी पार्थ पवारांना राज्यसभेसाठी पाठवण्याची चर्चा सुरू होती. पण त्यानंतर लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांना जर उमेदवारी दिली असती तर अजित पवारांवर घराणेशाहीचा आरोप होऊ शकला असता. त्यामुळं अॅडजस्टमेंट म्हणून सध्याच्या घडीला आपला आणखी चार वर्षांचा कालावधी बाकी असतानाच प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिला आहे. यामुळं राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा रिक्त झाली असून पुढे या रिक्त जागेवरच जेव्हा पोटनिवडणूक होईल तेव्हा पार्थ पवारांना तिथं उमेदवारी दिली जाईल. (Marathi Tajya Batmya)

Prafull Patel resignation connection with Parth Pawar
Electoral Bond: सुप्रीम कोर्टानं दिली SBIला डेडलाईन! राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉण्डद्वारे कुणी पैसा दिला? हे जाहीर करण्याचं आवाहन

पार्थ पवारांसाठी तडजोड

म्हणजेच येत्या लोकसभेला सुनेत्रा पवार या लोकसभा लढवतील त्यानंतर राज्यसभेच्या रिक्त जागेवरुन पार्थ पवार संसदेत येतील. तसेच नव्या जागेवरुन आधीच प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेत असणार आहेत. म्हणजेच पत्रकारांशी बोलताना जेव्हा प्रफुल्ल पटेलांनी आमच्याकडं अनेक लोकं येण्यास इच्छुक असल्याचं म्हणताना त्या व्यक्तीसाठीचं ही जागा असेल असं सुचवलं होतं. ही व्यक्ती म्हणजेच कदाचित पार्थ पवार असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com