देवेंद्र फडणवीस विधानसभेतही म्हणाले, 'मी पुन्हा येईन'

opposition leader devendra fadnavis speech in vidhan sabha
opposition leader devendra fadnavis speech in vidhan sabha

मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची आज, विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सभागृहातील सदस्यांनी ज्येष्ठ नेत्यांनी फडवणीस यांचे अभिनंदन केले. शेवटी फडणवीस यांचेही भाषण झाले. त्यांनी विरोधीपक्ष नेते म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल सभागृहाचे आभार मानले. त्याचवेळी त्यांनी, 'मी पुन्हा येईन' 'मी पुन्हा येईन'चा पुनरुच्चार केला. 

राजकारणात काहीही होऊ शकतं : फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'ज्या दिवशी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले त्यादिवशी राजकारणात काही ही होऊ शकतं, याचा प्रत्यक्ष अनुभव आला. आम्हाला 70 टक्के मतं पडली तरी, आम्ही सतेत नाही. पण, ज्यांना 40 टक्के पडली ते तीन एकत्र आले आणि 120 टक्के म्हणून एकत्र सत्ता स्थापन केली. हे लोकशाहीला हवं आहे का? विरोधीपक्ष नेता म्हणून काम करताना, संविधान आणि नियमांचं पुस्तक याच्या पलिकडे जाऊन मी कामकाज रेटून नेणार नाही, याची ग्वाही देतो. पण, सरकार ज्या ठिकाणी चुकेल तेथे मी बोटे ठेवणार आहे.' सभागृहाचे कामकाज सुरू होतानाच त्यांनी शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत मागणी केली. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला होता. ती मदत द्या, असे फडणवीस म्हणाले. 

पुन्हा शपथविधीचा मुद्दा
फडणवीस यांनी सभागृहात पुन्हा मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी चुकीची शपथ घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला. बराक ओबामा यांनी चुकीची शपथ घेतल्यानंतर पुन्हा शपथ घेतली होती याची पुन्हा फडणवीस यांनी सभागृहाला आठवण करून दिली. फडणवीस म्हणाले, 'आम्ही ही शिवाजी महाराज यांच नाव घेऊन आलो आहोत. या महापुरुषांची नाव कधी ही घ्या. पण, बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानात दिलं आहे तसं घ्या.'

पुन्हा 'मी पुन्हा येईन'
कितीही नाव ठेवली आणि चिडवलं तरी ही मी माझं काम करत राहणार, असं सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मी पुन्हा येईल म्हटलो होतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं मला पुन्हा इथं आणलं  आहे. मी पुन्हा येईल, असं म्हणालो होतो. पण, वेळ सांगितली नव्हती. त्यामुळं मी पुन्हा येईन.' ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी फडणवीस यांना 'पुन्हा नाही, परत येईन, म्हणा' असं सुचवलं होतं. त्याला फडणवीस यांनी, 'मी पुन्हा येईन आणि तुमच्या सकट येईन,' असं उत्तर दिलं. महाराष्ट्रात अनेक प्रोजेक्ट आम्ही सुरू केले. त्यांचं उद्घाटनही आम्हीच करू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com