esakal | नदी, नाले वाहू लागले; पावसाला सुरुवात झाली
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला - सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तेल्हारा तालुक्यात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर एवढा होता की नुकत्याच पेरणी केलेल्या शेतांनाही तडाखा बसला.

पुणे, कोल्हापूर, नगरमध्येही पाऊस
पुणे, कोल्हापूर, नाशिक, नगर, धुळे, नंदुबार जिल्ह्यातही हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पेरणी झालेल्या पिकांना हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. तर, कोकणात पावसाने दडी मारल्याचे चित्र असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी कडक उन्हं आणि सध्यांकाळी उशिरा पाऊस, असेच काहीसे हवामान पाहायला मिळत आहे. भात लावणीकरिता पाऊस वेळेत पडत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. शुक्रवारी सायकांळी उशिरा जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या. काही भागांत विजांच्या कडकडाटात दमदार पाऊस झाला.

नदी, नाले वाहू लागले; पावसाला सुरुवात झाली

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देश व्यापला असतानाच राज्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. वऱ्हाडातील अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. तर, सातारा जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसाने नुकसान केले. पुणे, कोल्हापूर, नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, औरंगाबादसह मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वऱ्हाडात शुक्रवारी (ता. २६) रात्री पावसाने जोरदार आगमन करीत संकटात टाकले. प्रामुख्याने सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर (जि. बुलडाणा) तालुक्यात काही मंडळांत अतिवृष्टी झाली असून, नदी-नाल्यांना पूर वाहिले. शेतांचे बांध फुटले असून, काही ठिकाणी गावातही सर्वत्र पाणीच पाणी साचले. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील विविध गावांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला. संग्रामपूर तालुक्यात पातुर्डा, बावनबीर मंडळांत अतिवृष्टी झाली. अनेक गावांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतांमध्ये शिरल्याने पिके व माती खरडून गेली आहे. शनिवारीसुद्धा दुपारी या भागात पावसाला पुन्हा सुरुवात झाली होती.

आरोग्यमंत्र्यांनी दिला 'हा' मूलमंत्र! कोरोनाचा संसर्ग अन्‌ मृत्यूदर होईल कमी

सातारा जिल्ह्यातही हजेरी
सातारा जिल्ह्यातील फलटण, माण तालुक्यात शुक्रवारी दमदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. फलटण तालुक्यात शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. घरे, जनावरांचे गोठे यांचे पत्रे उडून गेले. विजेचे अनेक खांब जमीनदोस्त झाल्याने वीजवाहक तारा तुटल्या आहेत. वाऱ्याने ऊस, मका व अन्य उभी पिके आडवी झाली. माण तालुक्यातील दहिवडी परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली.

जेईई, नीट परीक्षा पुढे ढकला; का होतीय अशी मागणी?

जुई प्रकल्प ओव्हरफ्लो
औरंगाबादसह मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावली. भोकरदन (जि. जालना) तालुक्यातील जुई मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने भोकरदन शहरासह पंचवीस गावांचा पाणी प्रश्न मिटला. उस्मानाबाद जिल्ह्यातील पाथरुडमध्ये शनिवारी एक तास जोरदार पाऊस झाला.

- शाळा सुरू करण्याबाबत देशभरातील मुख्याध्यापक काय म्हणताहेत? वाचा सविस्तर!

राज्यात वादळी पावसाची शक्यता
राज्याच्या विविध भागांत वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडत आहे. आज (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी; तर पश्‍चिम विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.