
मुंबई : ‘‘बँकांमध्ये मराठी सक्तीसाठी सुरू केलेल्या आंदोलनातून पुरेशी जागृती झाली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद दिसली. मराठी भाषा आणि मराठी माणसाला कोणी गृहीत धरू शकत नाही, हा संदेशही त्यातून गेला आहे. त्यामुळे आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही. आता मराठी लोकांनी आग्रह धरायला हवा. त्यांनीच कच खाल्ली तर मग ही आंदोलने कशासाठी करायची,’’ असा प्रश्न मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला.